घरमहाराष्ट्रकोकणातील रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या!!

कोकणातील रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या!!

Subscribe

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या आणखी काही गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.

गणेशोत्सवासाठी मध्य, कोकण रेल्वेतर्फे दरवर्षी जादा गाड्या सोडल्या जातात. पण, या जादा गाड्यांऐवजी सर्वच गाड्यांना दिवा येथे थांबे देण्याची मागणी आता जोर धरत आहे. दिवा स्थानकांत प्लॅटफॉर्मची लांबी ही अडचण नाही आहे. त्यामुळे गाड्यांच्या रचनेनुसार त्यांना थांबा देणे शक्य असल्याचे मत दिवा रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे मांडले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्यात येतात. त्यातील काही गाड्यांना दिवा, पेण येथे यावेळी पहिल्यांदाच थांबे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. पण, काही जादा गाड्यांऐवजी सर्वच गाड्यांना थांबे द्यावेत, अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी केली आहे.

‘दोन मिनिटांचा थांबा द्या’

दरम्यान, सर्व गाड्यांना एक मिनिटाऐवजी दोन मिनिटांचा थांबा द्यावा अशी मागणीही केली जात आहे. मध्य रेल्वेने सर्व जादा गाड्यांना थांबे दिल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल, असे मत स्थानिक दिवावासीय व्यक्त करत आहेत. दिवा स्थानकातून गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गणेश भक्तांना होणारा त्रास टळेल असे देखील या प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.

- Advertisement -

वाचा – गणपती स्पेशल ट्रेनला दिवा, पेणला अतिरिक्त थांबे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -