घरताज्या घडामोडीCoronavirus: दहावीचा सोमवारचा भुगोलाचा पेपर पुढे ढकलला

Coronavirus: दहावीचा सोमवारचा भुगोलाचा पेपर पुढे ढकलला

Subscribe

दहावीचा आज इतिहासाचा पेपर झाला. मात्र आता शेवटच्या भुगोलच्या पेपरची तारिख ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर दहावीचा सोमवारी होणार शेवटचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दहावीचा एक पेपर लांबणीवर गेला आहे. ३१ मार्चनंतर दहावीचा शेवटचा पेपरची तारिख जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावीचे दोन पेपर शेवटचे पेपर शिल्लक होते. त्यापैकी आज एक पेपर झाला आहे. मात्र आता शेवटचा भुगोलाचा पेपर कधी होणार आहे, याबाबत सरकार निर्णय घेणार आहे.

- Advertisement -

पहिली ते आठवीची परिक्षा रद्द

याआधी करोनामुळे पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच नववी आणि अकरावीची उर्वरित पेपर हे १५ एप्रिल नंतर घेण्यात येणार असल्याच आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. याशिवाय दहावीचे शिक्षक सोडून सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सूचना देखील दिली आहे. तसंच दहावीची परिक्षा वेळापत्रकानुसार होती असं देखील वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

महाराष्ट्रातील आकडा ५२ वरुन थेट ६३ वर पोहोचला

महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्हचा आकडा आणखी वाढला असून एका रात्रीत एकूण ११ जण पॉझिटिव्ह आढळल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. यात मुंबईचे एकूण १० जण असून १ जण पुण्यातील आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील आकडा ५२ वरुन थेट ६३ वर पोहोचला आहे. यापैकी परदेशवारी केलेल्या ८ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, तिघांना संसर्गातून करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वारंवार रेल्वे स्थानकात गर्दी करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. सर्व मेडिकल महाविद्यालयासाठी चाचणीसाठी प्रयत्न केलं जात आहेत. शिवाय, जर गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करावी लागेल असं पुन्हा एकदा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा  – Coronavirus: ‘नागपुकरांनो ऐकलं नाही तर बळजबरीनं घरी बसाववं लागेल’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -