घरमहाराष्ट्रअहमदनगर - पुणे महामार्गावर अपघात, ३ जण ठार; १५ जखमी

अहमदनगर – पुणे महामार्गावर अपघात, ३ जण ठार; १५ जखमी

Subscribe

अहमदनगर - पुणे महामार्गावर अपघात गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये ३ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत.

अहमदनगर – पुणे महामार्गच्या केडगावजवळच्या रेल्वे उड्डाणपुलावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमध्ये १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

असा घडला अपघात

जामखेड – मुंबई ही बस नगरहून पुण्याकडे निघाली होती. दरम्यान, पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकची पुलावर असलेल्या एसटीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेमुळे इतर वाहनांना देखील याचा फटका बसला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढून जवळी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर या अपघातात ३ जण ठार झाले आहेत. दरम्यान, ट्रकचालकाने मद्यपान केले असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

- Advertisement -

वाहतूक कोंडी

या अपघातानंतर नगर – पुणे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वाहनांच्या दूरपर्यंत रांगा देखील लागल्या होत्या. तसेच हा ट्रक नगरमधीलच एका वाहतूक कंपनीचा असून ट्रकचालकाने मद्यपान केले असल्याचा संशय बचावासाठी गेलेल्या नागरिकांना व्यक्त केला आहे. राजेंद्र मारुती पवार (५२, रा.जामखेड), जॉर्ज मार्कस गायकवाड (२६, रा. बुरुडगाव, नगर), प्रसाद धनंजय चव्हाण (२३, रा. चांदे कसारे, कोपरगाव), एकनाथ सुग्रीव रोडे (२४, रा. वैजा, पाटोदा-आष्टी), शुभम किशोर दगडे (वय २३, रा. शिरूर कासार, जि. बीड), अकबर जैनुद्दीन शेख (७४, रा. शिरूर, जि. पुणे), शालन महादेव साठे (४५, रा. औंध, पुणे), महादेव दादू साठे (५८, रा. औंध , पुणे) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून, अन्य तीन जखमींची अद्याप ओळख पटलेली नाही.


हेही वाचा – आज ‘मिग २७’ विमानांचा प्रवास संपणार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -