घरताज्या घडामोडीSt workers Strike : संप काळात एसटीला १२५ कोटी रूपयांचा तोटा -...

St workers Strike : संप काळात एसटीला १२५ कोटी रूपयांचा तोटा – शेखर चन्ने

Subscribe

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्यातील विविध भागात २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. साधारणपणे एसटी महामंडळामध्ये ९२,७०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील चालक- वाहक वगळता महामंडळाचा मेकॅनिकल स्टाफ मोठ्या प्रमाणावर कामावर उपस्थित आहे. २७ ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचा १२५ कोटी रूपयांचा तोटा झाल्याची माहिती शेखर चन्ने यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे.आज शुक्रवारी १२ नोव्हेंबरला एसटीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची एसटी संपाबाबत पत्रकार परिषद पार पडली.एसटीची तोडफोड केल्याप्रकरणी ३६ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत महामंडळाला सव्वाकोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याचे आवाहन केले असून, निलंबित करण्यात आलेले कर्मचारी कामावर येऊ शकत नाही, असं असलं तरी एकाही एसटी कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आलेले नाही, असे शेखर चन्ने यांनी स्पष्ट केले आहे.

कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन

२७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात जो एसटी कामगारांनी संप सुरु केला आहे. हा संप ३ नोव्हेंबरपासून अधिक वाढला असून, या संदर्भात एसटी महामंडळ प्रशासनातर्फे उच्च न्यायालयात तसेत औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या या दोन्ही न्यायालयांनी हा संप करण्यासाठी मान्यता दिली नाही. तरीसुद्धा हा संप कर्मचाऱ्यांनी सुरु ठेवला आहे.अशा परिस्थितीत जनतेची गैरसोय होऊ नये हा प्रमुख मुद्दा प्रशासनासमोर होता,त्यामुळे शासनाला विनंती केल्यानंतर शासनाने इतर वाहनातून ,खाजगी वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली.खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी आम्ही एसटी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हायचं आहे त्यांनी कामावर यावं, कोणी अडवणूक करु नये,यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाकडून मदत घेण्यात येणार आहे.तरी कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याचे आवाहन चन्ने यांनी केले आहे. आज १७ बस डेपोमधून ३६ बसेस रवाना करण्यात आल्या आणि त्यातून एकूण ८०० ते ९०० प्रवाश्यांनी प्रवास केला आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

हे ही वाचा – ST Workers Strike : सदाभाऊ खोत, पडळकर संप भडकवण्याचं काम करतायत – ॲड. अनिल परब


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -