घरताज्या घडामोडीराज्य सरकार कालीचरण बाबावर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

राज्य सरकार कालीचरण बाबावर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

Subscribe

छत्तीसगडची राजधानी रायपुर येथे आयोजित धर्म संसदेत संत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधीविषयी अपशब्दांचा वापर केल्याने ही संसद वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विधानसभेतही यावर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.या अकोला येथील रहिवासी असलेल्या कलीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी अपशब्द काढल्याने त्यांच्याविरोधात माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोमवारी २७ डिसेंबरला विधानसभेत दिले.

कालीचरणवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नवाब मलिक

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज विधानसभेत हा मुद्दा मांडला.ते म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचे श्रद्धास्थान आहे. आपल्या राज्यातील अकोल्याचा रहिवासी असलेल्या कालीचरण महाराज या भोंदू बाबाने राष्ट्रपित्याला शिवीगाळ केली आहे. सोशल मीडियावर तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्याने महात्मा गांधीचा अपमान केला आहे. बापूंच्या विचाराचा विरोध होऊ शकतो. पण गेल्या काही वर्षांत त्यांच्या खुन्याचे गोडवे गायले जात आहे. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते. पण म्हणून बापूंचा अपमान होऊ शकत नाही. त्यामुळे कालीचरण महाराजवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा. महात्मा गांधींना शिवीगाळ केलेले, अपमानित केलेले सहन करणार नाही.

- Advertisement -

यावर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी ,सरकार तुमचे आहे.तुम्हाला कोणी अडवले आहे, असा सवाल केला तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशी कारवाई करण्यास हरकत नसल्यचे सांगितले. यावर अजित पवार यांनी सर्व माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.


हेही वाचा – महात्मा गांधींबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी संत कालीचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -