घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिंदे सरकारने जाहीर केलेले शिधा किटची अद्याप प्रतीक्षाच

शिंदे सरकारने जाहीर केलेले शिधा किटची अद्याप प्रतीक्षाच

Subscribe

नाशिक जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबीय अशा सुमारे ७ लाख ९३ हजार ५९१ शिधापत्रिकाधारकांना या किटचा लाभ होणार आहे. जिल्हयात अंत्योदयचे १ लाख ७४ हजार ६१३ तर प्राधान्य कुटुंबातील ६ लाख १८ हजार ९७८ शिधापत्रिकाधारक आहेत.

नाशिक : सर्वसामा-न्यांची दिवाळी गोड व्हावी तसेच नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळावा याकरीता फक्त 100 रुपयांमधे प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. जिल्हयातील सात लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र दिवाळी आठवडाभरावर येउन ठेपली असतांनाही लाभार्थ्यांना शिंदे सरकारच्या भेटीची प्रतिक्षा लागून आहे.

- Advertisement -

महागाईने जनता होरपळून निघाली आहे. त्यामुळे महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी फक्त शंभर रुपयांमधे एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक किलो तेल देण्यात येईल असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. आपलीही दिवाळी गोड होईल या आशेने लोक दुकानांमधे पोहोचत आहेत. पण ग्राहकांना फक्त जाहिरातीवरच समाधान मानावं लागतय. कारण सरकारचा हा आनंदाचा शिधा अद्याप स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचलाच नाही. हे किट केव्हा देणार अशी विचारणा शिधापत्रिकाधारकांकडून करण्यात येत आहे.

राज्य सरकारकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन या संस्थेला 509 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. ज्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन संस्थेला हे कंत्राट देण्यात आलय ती संस्था स्वतः या पदार्थांचा पुरवठा करणार नसून त्यासाठी या संस्थेकडून पुरवठादार कंपन्यांना कंत्राट देण्यात आल आहे, अशी माहिती समोर आली आहे. राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारा शिधा पुरवठा कंपन्या इतक्या कमी कालावधीत कसा मिळवणार हा प्रश्न आहे. 10 ऑक्टोबरपासून हा शिधा मिळेल असं आधी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर ही तारीख वाढवून 15 ऑक्टोबर करण्यात आली. ती देखील उलटली मात्र तरीही शिधा दुकानापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना रिकाम्या हातानेच परतावेलागत आहे.

शिधापत्रिकाधारकांना द्यावयाच्या किटची मागणी शासनाकडे नोंदवली आहे मात्र अद्यापपर्यंत किट प्राप्त झालेले नाही. किट प्राप्त होताच तालुकानिहाय वितरण करून त्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. : अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -