घरमहाराष्ट्रमाझ्या मुलीची बदनामी थांबवा, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वडिलांची पहिली प्रतिक्रिया

माझ्या मुलीची बदनामी थांबवा, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वडिलांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

पूजाच्या आत्महत्येचे राजकारण केले जातंय

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे. बीडमधील परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण इंग्लिश स्पिकिंगच्या कोर्ससाठी पुण्यात आपल्या भावासोबत राहत होती. तीने राहत्या घराच्या इमारतीतून उडी घेत आत्महत्या केली आहे. परंतु तिच्या आत्महत्येनंतर काही कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यामुळे पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेचे विषय ठरले आहे. पुजा चव्हाणची आत्महत्या नसून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी मंत्री संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संजय राठोड यांच्यावर पुजा चव्हाणच्या आत्महत्येबाबतचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी असा आक्रमक पवित्राही विरोधी पक्ष भाजपच्या घेण्यात आला आहे. भाजपच्य प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करत कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुजाचे वडिलांनी पहिली प्रतिक्रिया दिले त्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले पूजाचे वडिल

पूजाच्या वडिलांनी आत्महत्या प्रकरणावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. पूजाच्या वडिलांनी असेल म्हटले आहे की, पूजा इमारतीवरुन उडी मारल्याने डोक्यावर पडली. तिला डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पूजाच्या जाण्याने प्रचंड धक्का बसला आहे. वडिलांनी सांगितल्यानुसार पोल्ट्री फार्मसाठी कर्ज घेतले होते. पंरुतु कोरोना आणि नंतर बर्ड फ्लूमूळे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्जाच्या हफ्त्याचे पूजाला प्रचंड टेंशन होते. ती निराश झाली होती. गावी नैराश्य वाढत असल्यामुळे पूजाने पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि ती पुण्याला गेली. तिकडेच तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली असल्याचे पूजाच्या वडिलांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पूजाच्या आत्महत्येचे राजकारण केले जात आहे. तिला पूजाच्या नावानं सुरु असलेल्या चर्चेमुळे बदनामी होत आहे. हीच बदनामी थांबवायला पाहिजे यामुळे घरच्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज हा पूजाचा नसल्याचेही वडिल लहूदास चव्हाण यांनी सांगितले आहे. आमचा कोणावर संशय नाही. पोलिसा त्याचा तपास करत आहेत. मी कोणावरही संशय नसल्याचा जबाब नोंदवला आहे. असे पूजा चव्हाणचे वडिल लहूदास चव्हाण यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -