घरदेश-विदेशChandra Grahan 2023 : 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण; सर्वात मोठी खगोलीय घटना

Chandra Grahan 2023 : 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण; सर्वात मोठी खगोलीय घटना

Subscribe

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सकाळी 1:05 ते पहाटे 2:24 पर्यंत प्रभाव दाखविणार आहे.

नवी दिल्ली : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि सूर्यग्रहण वेळोवेळी होत असते. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला होणार आहे. या दिवशी शरद पौर्णिमा देखील आहे. ज्योतिष शास्त्रात ही घटना खूप महत्त्वाची मानली जाते, कारण 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार आहे.
चंद्रग्रहणाच्या दिवशी गजकेसरी योगही आहे. अशा परिस्थितीत या ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अनपेक्षित आर्थिक लाभ आणि प्रगती होऊ शकते. (Chandra Grahan 2023  Lunar eclipse on Sharad Purnima after 30 years The largest astronomical event)

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सकाळी 1:05 ते पहाटे 2:24 पर्यंत प्रभाव दाखविणार आहे. या दिवशी संध्याकाळी 4:06 वाजता चंद्रोदय होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणाचे सुतक दुपारी 4:05 पासून सुरू होणार आहे.

- Advertisement -

चंद्रग्रहणा या देशांत दिसणार चंद्रग्रहण

चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो. सुतक काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सुतक 28 ऑक्टोबरला संध्याकाळी 4.05 वाजता सुरू होणार आहे. भारताशिवाय अनेक देशांमध्येही चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण-पूर्व अमेरिका, उत्तर अमेरिकेचा ईशान्य प्रदेश, हिंदी महासागर, दक्षिण प्रशांत महासागर या भागात दिसणार आहे.

हेही वाचा : मुंबईत पुन्हा अग्नितांडव! कांदिवलीत इमारतीला लागली आग, तिघांचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisement -

चंद्रग्रहण म्हणजे काय?

खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये असते तेव्हा चंद्राला ग्रहण लागते. एकुणच त्यामुळे सूर्यप्रकाश रोखला जातो. तो प्रकाश चंद्रावर पडत नाही. परिणामी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. ही चंद्रग्रहणाची स्थिती आहे. अशा प्रकारे पाहिले असता, पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि त्यामुळे दोन्ही ग्रह पृथ्वीवर परिणाम करतात.

हेही वाचा : ना ठाकरे ना शिंदे, यंदा मुंबईचे डबेवाले कोणत्याच दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत; कारण…

 

ग्रहण काळात आणि नंतर काय करावे?

सुतक आणि ग्रहण काळात तुम्ही चंद्राशी संबंधित मंत्रांचा जप करू शकता. 28 ऑक्टोबर रोजी ग्रहणकाळात सूर्यास्तानंतर आपल्या क्षमतेनुसार व ज्योतिषांच्या सल्ल्याने दानाची प्रतिज्ञा घ्यावी आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून दान द्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -