घरताज्या घडामोडीपुण्यातील निर्बंध आणखी कडक, महापालिकेकडून नवी नियमावली जाहीर

पुण्यातील निर्बंध आणखी कडक, महापालिकेकडून नवी नियमावली जाहीर

Subscribe

पुण्यात नव्या नियमावलीनुसार खानावळींना सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरु ठेवण्याची परवानगी

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आला आहे. पुण्यातील सर्व खासगी, आणि शासकीय रुग्णालये भरले आहेत. पुण्यातील नागरिकांची बेडसाठी वणवण सुरु आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि विनावश्यक नागरिक बाहेर फिरत असल्यामुळे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु पुण्यात अजूनही वर्दळीच्या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे पुन्हा नव्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये आता पुण्यामध्ये अत्यावश्यक तसेच मेडिकल आणि चष्म्याची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यात नव्या नियमावलीनुसार खानावळींना सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर मध्यविक्री आणि चष्म्याच्या दुकानांना परवानगी दिली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक नसल्याचे नव्या नियमावलीमध्ये म्हटले आहे. मध्य विक्रीला परवानगी दिली असली तरी यामध्ये फक्त घरपोच पुरवण्याची मुभा देण्यात आली आहे. ही सेवा सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

पालिकेच्या नव्या नियमांनुसार चष्म्याची दुकाने ही सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले आहे. पुण्यामध्ये शनिवारी आणि रविवारी फक्त मेडिकलची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यावर कडक कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -