घरताज्या घडामोडीStudents Agitation: ऑफलाइन परीक्षांच्या विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर, पाहा नागपूर, मुंबईतील आंदोलनाची...

Students Agitation: ऑफलाइन परीक्षांच्या विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर, पाहा नागपूर, मुंबईतील आंदोलनाची दृश्ये

Subscribe

हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथवले होते. हिंदुस्थानी भाऊसोबत मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू बैठक घेणार आहेत.

राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या निर्णयानंतर विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याने पहायला मिळाले. सरकारच्या निर्णयाच्या विरोधात नागपूर, औरंगाबादसह मुंबईतील धारावी परिसरात हजारोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवण्यात आणि या आंदोलनाचा मुख्य सूत्रधार हा यूट्यूबर हिंदुस्तानी भाऊ असल्याचे समोर आले. हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथवले होते. हिंदुस्थानी भाऊसोबत मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू बैठक घेणार आहेत. दरम्यान मुंबई ऑफलाइन परीक्षांच्या विरोधात नागपूर मुंबईतून रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांची आंदोलनाची काही दृश्ये पाहा. ( फोटो – दीपक साळवी )

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -