घरCORONA UPDATEपीडीएफ पुस्तकांना विद्यार्थ्यांची मागणी; १५ दिवसांत ३५ लाख पुस्तके डाऊनलोड

पीडीएफ पुस्तकांना विद्यार्थ्यांची मागणी; १५ दिवसांत ३५ लाख पुस्तके डाऊनलोड

Subscribe

बारावीची नवीन पीडीएफ स्वरुपातील तब्बल १२ लाख ४० हजार जणांनी तर पहिली ते अकारावीच्या वर्गाची २३ लाख १३ हजार जणांनी पुस्तके डाऊनलोड केली आहेत.

अभ्यासक्रमाची पुस्तके डाऊनलोड करून अभ्यासाला सुरुवात करण्याच्या बालभारतीच्या आवाहनाला राज्यभरातील विद्यार्थ्यांची पसंती मिळत असून अवघ्या १५ दिवसांतच ३५ लाख ५३ हजार पुस्तके डाऊनलोड करण्यात आली आहेत. यामध्ये बारावीची नवीन पीडीएफ स्वरुपातील तब्बल १२ लाख ४० हजार जणांनी तर पहिली ते अकारावीच्या वर्गाची २३ लाख १३ हजार जणांनी पुस्तके डाऊनलोड केली आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन परिस्थितीमुळे बाजारातून नवीन पुस्तके विकत घेणे शक्य नसल्याने पीडीएफ स्वरूपात बालभारतीने पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शिक्षक संघटना आणि पालकांकडून केली जात होती. ही मागणी मान्य करत बालभारतीने अभ्यासक्रमाची पुस्तके पीडीएफ स्वरूपात देण्याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिली. अवघ्या १५ दिवसांत विद्यार्थ्यांनी लाखांच्यावर पुस्तके डाऊनलोड करत चांगलाच प्रतिसाद दिला. बारावीला वाणिज्य आणि विज्ञान शाखेची सर्वाधिक पुस्तके डाऊनलोड झाली आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांची पुस्तके लाखांच्या घरात डाऊनलोड करण्यात आली. तर इंग्रजी विषयाचे पुस्तक १ लाख २६ हजार जणांनी ऑनलाइन मिळवले आहे.

- Advertisement -

पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द केल्यामुळे सुटीच्या काळात विद्यार्थी पुढील वर्गाच्या तयारीला लागल्याचे चित्र पीडीएफ डाऊनलोड केलेल्या संख्येवरुन दिसत आहेत. १८ मार्च ते २६ एप्रिल या काळात तब्बल २३ लाख १४ हजार जणांनी पुस्तके डाऊनलोड करुन घेतली आहेत. पुस्तकाच्या मागणीमुळे मिळालेल्या सुट्टीचा वापर पालक चांगलाच उपयोग करत आहेत. चौथी आठवी, नववी आणि दहावीच्या पीडीएफ ऑनलाइन पुस्तकांना सर्वाधिक मागणी असल्याचे बालभारतीकडून सांगण्यात आले.

बारावीची डाउनलोड केलेल्या पुस्तकांची संख्या

मराठी : ६७,१००
इंग्रजी युवकभारती : १,२६,१००
भौतिकशास्त्र : १,२६,५००
रसायनशास्त्र : १,२०,५००
जीवशास्त्र : १,०५,१००
गणित (सायन्स) – पार्ट १ : १,१२,८००
गणित (सायन्स) –  पार्ट २ : १,०७,३००
मराठी : ६७,१००
अर्थशास्त्र (इंग्रजी) : ३९,७००
अर्थशास्त्र (मराठी) : ३१,९००
राज्यशास्त्र (इंग्रजी) : ११,७००
सहकार (मराठी) : १०,६००
एकूण :  बारावी १,२४,०२००

- Advertisement -

इयत्ता निहाय पुस्तकांची पीडीएफ मागणी

पहिली : १,७५,९००
दुसरी : ६२,६००
तिसरी : ८२,२५०
चौथी : २,६४,६५०
पाचवी : १,३८,०००
सहावी : १,८८,६००
सातवी : १,९१,५००
आठवी : २,२४,१००
नववी : २,५३,१५०
दहावी : ५,१९,१९५
अकरावी : २,४३,८००
एकूण : २३,१३,९००

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -