घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकच्या आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांनी लुटला वानखेडेवर आयपीएल मॅच बघण्याचा आनंद

नाशिकच्या आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांनी लुटला वानखेडेवर आयपीएल मॅच बघण्याचा आनंद

Subscribe

नाशिक : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा उत्सव अर्थात आयपीएल प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहण्याची संधी ग्रामीण भागातील तब्बल १५० विद्यार्थ्यांना मिळाली. यात दिंडोरी व इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये आयपीएलचा सामना पाहिला. यावेळी विद्यार्थी आनंदीत होते.

सध्या सर्वत्र आयपीएल फिवर सुरू असून, एकदा तरी मैदानात जावून प्रत्यक्ष क्रिकेट सामने पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अनेक क्रीडाप्रेमी हौसेखातर आयपीएलचे तिकीट काढून मैदानात जाऊन प्रत्यक्ष मॅचचा अनुभवही घेतात. मात्र, नाशिकमधील ग्रामीण भागातील १५० विद्यार्थ्यांना आता मैदानात पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. रिलायन्स फाउंडेशन व द लॅन्ड एम्पायर चे सी. एम. डी. मंदार वाईकर आणि निवास डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली.

- Advertisement -

नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान परिसरातून बस मुंबईला मार्गस्थ झाल्याने या बसला पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी झेंडा दाखवला. याप्रसंगी राम बंधू उद्योग समूहाचे हेमंत राठी, नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, चेंबर ऑफ कॉमस चे व्हाइस प्रेसिडेंट देशमुख, संजय सोनवणे, नाना शेवाळे, गोरख बोडके आदी उपस्थित होते.

इगतपुरी व दिंडोरी तालुक्यातील दीडशेहून अधिक विद्यार्थी १६ एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना पाहण्यास गेले होते. यासाठी इगतपुरी व दिंडोरी तालुक्यातील आश्रमशाळा व विद्यालयांशी संपर्क साधण्यात आला. त्या शाळांमधील खेळाडू क्रिकेटची आवड असणार्‍या विद्यार्थिनींची निवड करण्याचे शिक्षकांना सांगण्यात आले. त्यानुसार तिन्ही शाळांमधून प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात दिंडोरी तालुक्यातील खुशिराज प्राथमिक आश्रमशाळा, इगतपुरी तालुक्यातील ज्ञानदा विद्यालय मोडाळे आणि महात्मा गांधी विद्यालय इगतपुरी नजीकच्या आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील आयपीएल सामना पाहण्याचा आनंद घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -