घरमहाराष्ट्र94 टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्याची आत्महत्या

94 टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्याची आत्महत्या

Subscribe

प्रवेश मिळण्याच्या विवंचनेतून जीवन संपवले

परीक्षेत अपयश आल्यानंतर आत्महत्या करण्याच्या घटना आपल्या कानावर येतच असतात.परंतु, आता परीक्षेत देदीप्यमान यश मिळवून देखील पाहिजे त्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळण्याच्या निराशेने उस्मानाबाद जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कळंब तालुक्यातील अक्षय शहाजी देवकर या मुलाने चांगल्या गुणांनी दहावी पास होऊनही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अक्षयला दहावीत 94.20 टक्के गुण मिळाले होते. तसेच त्याला लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये प्रवेश हवा होता.परंतु, तो न मिळण्याच्या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर शिष्यवृत्तीही मिळणार नाही, या नैराश्येतून त्याने गुरूवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

अक्षयला गणितामध्ये 99 गुण मिळाले होते. चांगले गुण मिळाल्याने अक्षयला लातूरमधील शाहू कॉलेजला प्रवेश हवा होता. मात्र, आपला नंबर लागेल की नाही तसेच शुल्क कसे भरायचे या चिंतेने अक्षयने आपले जीवन संपवले. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना देखील त्याचे वडील शहाजी देवकर आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी धडपडत होते. दहावीला चांगले गुण मिळाले म्हणून ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. त्यावेळीही शाहू कॉलेजला नंबर लागल्यानंतर सत्कार करा, तोपर्यंत नको, असे त्याने बोलून दाखवले होते.

- Advertisement -

आरक्षण गेले खड्ड्यात-संभाजीराजे

या घटनेनंतर खा. छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत आरक्षण गेले खड्ड्यात; पदवीपर्यंत सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. 94 टक्के गुण मिळूनही प्रवेश न मिळणे ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुले अतोनात कष्ट घेऊन गुणांची कमाई करीत असतील आणि तरी त्या गुणवत्तेला न्याय मिळत नसल्याने माझ्या मनात संतापाची भावना आहे,असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -