घरमहाराष्ट्रखासदार संजय राऊत यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी

खासदार संजय राऊत यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी

Subscribe

शिवसेनेचे खासदार, मुख्य प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांच्यावर गुरुवारी दुपारी लिलावती रुग्णालयात यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या हृदयात दोन स्टेन टाकण्यात आल्या असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डॉ. सॅम्युअल मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर संजय राऊत यांच्या शस्त्रक्रियेवेळी लिलावती रुग्णालयात उपस्थित होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

दरम्यान, गुरुवारी दुपारी दुसऱ्यांदा संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. संजय राऊत यांची प्रकृती आता स्थिर असून, सध्या ते आयसीयूमध्येच आहेत. त्यांना आज, शुक्रवारी दुपारी आयसीतून साधारण वॉर्डमध्ये आणण्यात येईल. यानंतर अजून तीन ते चार दिवस संजय राऊत हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली लिलावती रुग्णालयात राहणार आहेत. तथापि, संजय राऊत यांच्यावर ११ नोव्हेंबर २०१९ रोजी लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ. सॅम्युअल मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांनीच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती. दरम्यान, पुन्हा एकदा राऊतांवर डॉ. सॅम्युअल मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. सॅम्युअल मॅथ्यू हे प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ आहेत. तर डॉ. अजित मेनन मुंबईस्थित हृदयविकार तज्ज्ञ आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -