घरताज्या घडामोडीस्वस्त EMIसाठी सामान्यांना वाट पाहावी लागणार - RBI

स्वस्त EMIसाठी सामान्यांना वाट पाहावी लागणार – RBI

Subscribe

आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला.

भारतीय रिझर्व्ह बँकची (RBI) आर्थिक धोरण आढावा बैठक आज पार पडली आहे. रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक निर्णय जाहीर केले आहेत. पुढील काही महिने अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आरबीआयने रेपो रेट (Repo rate) स्थिर ठेवला आहे, म्हणजेच व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. तसेच ग्राहकांना ईएमआय (EMI)साठी वाट पाहावी लागणार आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून बँकेने पॉलिसी रेट आणि रेपा रेट १.१५ टक्क्यांनी कपात केला होता. अखेर मे महिन्यात व्याजदर ०.४० टक्के आणि मार्चमध्ये ०.७५ टक्क्यांनी कपात करण्यात आला होता. दरम्यान शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय आर्थिक धोरण समितीची बैठक २ डिसेंबरपासून सुरू होती.

पत्रकार परिषदेमधील मुद्दे –

  • आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरण समितीच्या सदस्याचे आभार मानले.
  • आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही आहे. ४ टक्केच ठेवला आहे. एमपीसीने एकमताने हा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ईएमआय किंवा कर्जाच्या व्याजदरावर ग्राहकांना नवीन दिलासा मिळालेला नाही.
  • रिव्हर्स रेपो दरही ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असल्याचे दास म्हणाले.
  • तसेच बँक दर न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो ४.२५ टक्के आणि रोख राखीव प्रमाण ३ टक्क्यांवर स्थिर आहे.
  • एसएलआर १८ टक्के आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) रेट ४.२५ टक्के आहे.
  • महागाईची उच्च पातळी लक्षात घेता, पॉलिसी दर कायम ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे.
  • यावेळी दास म्हणाले की, ‘आम्ही अर्थव्यवस्थेत पुरेशी रक्कम उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करू आणि गरज पडल्यास आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू.’
  • ‘पुढच्या तिमाहीत देशाच्या जीडीपीत (GDP) वाढ नकारात्मक कडून सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे’, असे दास म्हणाले.
  • पुढील तिमाहीत जीडीपीच्या वाढीचा अंदाज ०.१० टक्क्यांपर्यंत वाढविला. तसेच चौथ्या तिमाहीत देशाची जीडीपी ०.७० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

    हेही वाचा – CBI, ED सह सर्व सरकारी कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; सुप्रीम कोर्टाचे आदेश

    - Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -