घरताज्या घडामोडीमंत्रालयासमोर आणखी एक आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर आणखी एक आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

स्वातंत्र्यादिनी एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला असतानाच आणखी एका अशाच घटनेची पुनरावृत्ती आज शुक्रवारीही मंत्रालयाच्या गेटसमोर घडली. मंत्रालयाच्या गेटसमोर विष पिऊन आत्महत्या प्रयत्न एका व्यक्तीने आज केला. गावची जमीन आणि घर बळकावल्याच्या वादातून या व्यक्तीने मंत्रालयाच्या गेटसमोर विष पिण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील आंबेगावच्या सुभाष जाधव ( वय ५४) वर्षीय व्यक्तीने हा विषप्राशनाचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेले. मंत्रालयाच्या गार्डन गेट येथे हा प्रकार घडला.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील व्यक्ती असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या कारभाराला कंटाळून या व्यक्तीने अखेर मंत्रालयासमोर विष घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांच्या संदर्भात मंत्रालयात ही व्यक्ती तक्रार घेऊन आली होती. पण या विष प्राशनाच्या प्रयत्नानंतर या व्यक्तीला पोलिस सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. याआधीही स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाच्या घटनेत एका व्यक्तीने पोलिसांच्या कारभाराला कंटाळूनच आत्मदहन करत असल्याचे सांगितले होते. त्यापाठोपाठच आता ही दुसरी घटना घडली आहे. त्या घटनेतही पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. सोयाबीन आणि मक्याचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीवर स्थानिक पोलिसांकडून अन्याय झाल्यानेच या व्यक्तीने आत्मदहनाचा मार्ग निवडला होता. या घटनेत मंत्रालय पोलिसांनी वेळीच त्या व्यक्तीला रोखल्याने पुढचा प्रसंग टळला.

- Advertisement -

मंत्रालयाच्या समोर याआधीही आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. तर मंत्रालयातील इमारतीवरूनही उडी टाकण्याचे प्रकार याआधी घडले आहेत. त्यामुळेच मंत्रालयात संरक्षक जाळी ही पहिल्या मजल्यावर बसवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांच्या कारभाराला कंटाळून अशा पद्धतीची ही अवघ्या आठवड्याभरातील दुसरी घटना आहे. स्थानिक पातळीवर पोलिसांकडून अन्याय होत असल्यानेच पोलिसांविरोधात अशा पद्धतीचा निर्णय या व्यक्तींनी घेतला आहे. त्यामध्ये कोणतीही जिवित हानी मात्र झाली नाही.


हे ही वाचा – मंत्रालयासमोर जळगावच्या व्यापाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -