घरमहाराष्ट्रदिवाळीपर्यंत थांबा, राज्यात भाजपचं सरकार येणार; सुजय विखे पाटलांची भविष्यवाणी

दिवाळीपर्यंत थांबा, राज्यात भाजपचं सरकार येणार; सुजय विखे पाटलांची भविष्यवाणी

Subscribe

राज्यात दिवाळीनंतर भाजपचं सरकार येणार असल्याचं भाकीत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सरकार कधी पडणार याची भविष्यवाणी करत आहेत. दरम्यान, आता सुजय विखे पाटलांनी भाकीत केलं आहे.

सुजय विखे पाटील यांनी कर्जत पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीत थोडं थांबा, दिवाळीनंतर आपलंच सरकार येणार आहे, असा दावा केला आहे. या दाव्याची चर्चा झाल्यानंतर त्यांनी घुमजाव केला. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी तसं विधान केलं, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. यापुढेही असं बोलत राहू असही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी ते कर्जत दौऱ्यावर होते. त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी बोलतांना दिवाळी नंतर राज्यात भाजप सरकार येईल असा दावा केला होता.

- Advertisement -

रोहित पवार यांच्या मतदारसंघात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार असून त्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी खासदार विखे पाटील आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यात आढावा बैठका घेतल्या. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. सरकारी लसीकरण केंद्राचाही आढावा घेऊन लसीकरणाला अधिक गती देण्याच्या सूचना केल्या.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -