घरमहाराष्ट्रहुर्रर्र... बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च मान्यता; फडणवीस - कोल्हेंनी केले स्वागत

हुर्रर्र… बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च मान्यता; फडणवीस – कोल्हेंनी केले स्वागत

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पेढे वाटून जल्लोष केला. तर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील या निर्णायाचे स्वागत केले आहे.

तब्बल 12 वर्षांनंतर अखेर बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने बैलगाडा शर्यतीला अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे आता गाडा मालक, गाडा शौकीन, बैलगाडा शर्यत करणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सुमारे 400 वर्षांपासूनची परंपरा पुन्हा एकदा सुरु राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पेढे वाटून जल्लोष केला. तर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील या निर्णायाचे स्वागत केले आहे. ( Supreme court decision on Bullock Cart Force Devendra Fadnavis and NCP leader Amol Kolhe welcomed the decision )

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बैलगाडा शर्यतीबाबात महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा हा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. याचा अतिशय आनंद असल्याचं ते म्हणाले.  बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती तेव्हा मुख्यमंत्री म्हणून मी स्वत: हा कायदा तयार केला होता. तेव्हा पुन्हा बैलगाडा शर्यत सुरु झाली. त्यानंतर पुन्हा काही याचिका दाखल झाल्या. सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं की, बैल हा धावणारा प्राणी नाही, त्यामुळे हा कायदा अवैध आहे. त्यानंतर त्यावर स्थगिती आली. आपण लगेच यावर बैल धावणारा प्राणी असल्याचं सांगणारी वैज्ञानिक कमिटी स्थापन केली आणि हा अहवाल तयार करुन सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली आणि याच प्रयत्नांमुळे आता मोठं यश आल्याचं, फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

अमोल कोल्हे म्हणाले की, तुम्ही सर्वांनी साथ दिली म्हणून ही गोष्ट साध्य झाली. ही अत्यंत आनंदाची गोष्ट होती. बैलगाडा मालक आणि शौकिनांनी प्रयत्न केला. हे सर्वांचं यश आहे. महाविकास आघाडीचं सरकार आणि आताच्या सरकारने ही केस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा निकाल आला, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

( हेही वाचा: मोठी बातमी : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत होणारच, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय )

- Advertisement -

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही शर्यत आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या उद्योगाला चालना देणारी ही शर्यत आहे. भल्या भल्यांना वाटत होतं बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळणार नाही. पण मी आत्मविश्वासाने पहिल्यापासून सांगत होतो की बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठेल. मी सर्वांचा ऋणी आहे. सरकार आणि यंत्रणांनी साथ दिली, असं अमोल कोल्हे म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -