घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर, कोणाच्या नेतृत्वात घटनापीठ असणार?

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर, कोणाच्या नेतृत्वात घटनापीठ असणार?

Subscribe

महाराष्ट्रातील शिंदे सरकारच्या भवितव्यासंदर्भात २३ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या सुनावणीत २५ ऑगस्टला सुनावणी घेण्यात येईल, असं म्हटलं होतं. परंतु महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुनावणी लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी झाली नसून ती पुढच्या १० दिवसांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२३ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आणि २५ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आज देखील सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे कोणाच्या नेतृत्वात घटनापीठ असणार?, असा देखील प्रश्न येथे निर्माण होत आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा उद्या निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती यू.यू. ललित हे भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाची सुनावणी करणाऱ्या घटनापीठाची निर्मीती देखील नवे सरन्यायाधीश करण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ४ सप्टेंबरपर्यंत सुनावणी लांबणीवर पडल्याची माहिती मिळत आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरील ३२ पानांच्या यादीनुसार २ सप्टेंबरपर्यंतच्या कामकाजामध्ये महाराष्ट्रातील याचिकांचा समावेश करण्यात आलेला नाही. घटनापीठात कोणते पाच न्यायमूर्ती असतील याबाबत चित्र अद्यापही अस्पष्ट आहे.

- Advertisement -

राज्यातील या सत्तासंघर्षावर 12 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. पण ती 10 दिवस पुढे ढकलून 22 ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित झाले. पण त्रिसदस्यीय खंडपीठामधील एक न्यायमूर्ती उपस्थित नसल्याने 23 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात आली. मात्र ही सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली होती.


हेही वाचा : आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचा निवाडा करणार पाच सदस्यीय घटनापीठ, 25 ऑगस्टला सुनावणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -