घरताज्या घडामोडीपुणे-बंगळुरू महामार्गावर साऊंडप्रुफ वॉल उभारावेत, सुप्रिया सुळेंची नितीन गडकरींना पत्रातून मागणी

पुणे-बंगळुरू महामार्गावर साऊंडप्रुफ वॉल उभारावेत, सुप्रिया सुळेंची नितीन गडकरींना पत्रातून मागणी

Subscribe

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, हवेचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून मदत करण्याची मागणी केली आहे. या राष्ट्रीय महामार्गावर वाढती वाहनांची गर्दी आणि प्रदूषणाचा त्रास पुणेकरांना होत असल्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर साऊंडप्रुफ वॉल उभारावेत, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे नितीन गडकरींना केली आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्येची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुण्यातील महामार्गावर वाकड ते नर्हे या मार्गावर साऊंडप्रुफ वॉल आणि बॅरियर उभारावेत, अशी विनंती गृहनिर्माण संस्था आणि विविध संस्था करत आहेत.

पुणे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मंत्री नितीन गडकरी आणि NHAI प्राधिकरण याबाबत चौकशी करावी. तसेच वाढलेली वाहतूक आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदुषणाच्या समस्येबाबत लक्ष घालावे, अशी देखील विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजप कार्यालयासमोर तृतीयपंथीयांचे आंदोलन, राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -