घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली अज्ञात कार; थोडक्यात अपघात वाचला

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली अज्ञात कार; थोडक्यात अपघात वाचला

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या वाहनांचा ताफा राजभवन (Rajbhavan) येथून वर्षा निवास्थानी जात असताना थोडक्यात अपघात वाचला. एका अज्ञात कारने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवली. मात्र ताफ्यातील वाहनचालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या वाहनांचा ताफा राजभवन (Rajbhavan) येथून वर्षा निवास्थानी जात असताना थोडक्यात अपघात वाचला. एका अज्ञात कारने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवली. मात्र ताफ्यातील वाहनचालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. मलबार हिलवरील (Malabar Hill) रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाला. शिवाय राजकिय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली आहे. (cm uddhav thackeray unidentified car breaks cm safety shield)

हेही वाचा – औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

- Advertisement -

मुख्यमंत्र्याचा ताफा रस्त्यावरून जात असताना दोन्हा मार्गावरील वाहतूक थांबवली जाते. पोलीसांचा (Police) बंदोबस्तही मोठ्याप्रमाणात असतो. यावेळी मुख्यमंत्री जात असताना त्यांच्या ताफ्यात कोणतेही वाहन जाण्यास मनाई असते. मात्र आज अचानक एक गाडी त्यांच्या ताफ्यात आली. एका इसमाने गाडी बंगल्याच्या बाहेर घेत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा आडवे जात विरुद्ध दिशेने पुढे निघून गेला. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा ताफा काही क्षणासाठी थांबला. दरम्यान, या प्रकरणामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच पोलीसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.

हेही वाचा – वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी अतिरक्त दोन इको बटालियनची केंद्राकडे मागणी

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर गेले होते. तिथून परतत असताना धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्यांचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनोळखी गाडी शिरल्यानं आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडूनही कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यांना एक न्याय आणि धनाड्यांना एक न्याय पोलिसांकडून देण्यात येतो का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.


हेही वाचा – राज ठाकरेंना न्यायालयाचा दिलासा; ‘त्या’ प्रकरणी अटक वॉरंट रद्द

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -