घरताज्या घडामोडीभाजप कार्यालयासमोर तृतीयपंथीयांचे आंदोलन, राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध

भाजप कार्यालयासमोर तृतीयपंथीयांचे आंदोलन, राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयकडून (ईडी) सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ तृतीयपंथीयांनी शुक्रवारी मंत्रालयाजवळील भाजप कार्यालयासमोर यावेळी तृतीयपंथीयांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणारे हे तृतीयपंथी प्रथम ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार होते. मात्र, त्यांनी अचानक आपला मोर्चा भाजप प्रदेश कार्यालयाकडे वळविला. जेव्हा मोर्चा कार्यालयाबाहेर आला तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कार्यालयात उपस्थित होते. अचानक आलेल्या या मोर्चामुळे त्यांची तारांबळ उडाली.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील हे भाजप कार्यालयात असल्याचे कळल्याने तृतीयपंथी मोर्चेकरांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यालयाबाहेर असलेल्या पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना रोखून धरले. या आंदोलनादरम्यान तृतीयपंथीयांनी राहुल गांधी यांच्यावर ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध केला. हे आंदोलन कोणत्या संघटनेने किंवा कोणा राजकीय पक्षाच्या सांगण्यावरुन केले हे मात्र कळू शकले नाही. काँग्रेसने यावर कानावर हात ठेवले आहेत.

राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करण्यासाठी मुंबईत महिला काँग्रेसचा आज दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयावर मोठा मोर्चा निघणार होता. या मोर्चाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता. पण मोर्चाची ठरवलेली वेळ निघून २ तास झाले, तरी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या जमल्या नव्हत्या. विशेष म्हणजे या मोर्चाकडे काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून राहुल गांधी हे ईडीच्या जाळ्यात अडकलेले दिसून येत आहे. तीन ते चार वेळा ईडीने त्यांना समन्स बजावलं होतं. आज पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत.


हेही वाचा : प्लास्टिक संदर्भात नागपूर महापालिकेचा मोठा निर्णय, १ जुलैपासून करणार धडक कारवाईला सुरूवात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -