घरमहाराष्ट्रMPSC चा भोंगळ कारभार; मृत स्वप्नील लोणकरचं मुलाखतीच्या यादीत नाव

MPSC चा भोंगळ कारभार; मृत स्वप्नील लोणकरचं मुलाखतीच्या यादीत नाव

Subscribe

MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्षे झाली तरी नोकरीत समाविष्ट न केल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. शिक्षण असून नोकरी नसल्याने आणि घरीची हलाखीची परिस्थिती पाहता स्वप्नीलने नैराश्येतून २९ जूनला आत्महत्याचे पाऊल उचलले होते. स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे राज्यातील राजकारणही चांगलेच तापले होते. एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनीही ठिकठिकाणी सरकारविरोधात आंदोलने केली. यानंतर राज्य सरकारने MPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखतीची तारीख जाहीर केली. यातच नुकतीच एमपीएससीने मुलाखतीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र य़ातून MPSC चा भोंगळ कारभार समोर आला आहे. कारण एमपीएससीच्या मुलाखतीच्या यादीत स्वप्नील लोणकरचं नाव देखील समाविष्ठ केलं आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ च्या मुलाखतीच्या यादीत स्वप्नीलचे नाव आलं आहे. मात्र या प्रकारामुळे आत्ता स्वप्नीलच्या कुटुंबीय आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय.

 Swapnil lonkar who committed sucide is named  mention in mpsc interview list
MPSC चा भोंगळ कारभार; मृत स्वप्नील लोणकरचं मुलाखतीच्या यादीत नाव

“एमपीएससीने माझ्या मुलाचा जीव घेतलाय”

एमपीएससी आयोगाचे पत्र स्वप्नीलच्या घरी पोहचले. यावर स्वप्नीलच्या वडीलांनी तीव्र शब्दात संपात व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वप्नीलच्या वडीलांनी सांगितले की, “एमपीएससी आयोगाचं पत्र आलय. त्यात स्वप्नीलच्या मृत्यूचा उल्लेख करण्यात आलाय. महाराष्ट्र सरकारलाही याची माहिती असतानाही एमपीएससी मुलाखतीसाठी तारीख जाहीर करत आहे. याचा अर्थ स्वप्नील कच्चा नाही तर एक हजार टक्का हुशार होता. एमपीएससीने माझ्या मुलाचा जीव घेतलाय. इकतेच नाही तर लोणकर कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम एमपीएससी करत आहे.”

- Advertisement -

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा उर्तीर्ण होऊनही गेली २ वर्षे मुलाखतीच झाल्या नाही. यामुळे स्वप्नील लोणकर हा तरुण नैराश्येत गेला. परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेने घेतलेल्या कर्जाचा वाढता डोंगर आणि घराच्या बिकट परिस्थितीला कंटाळून स्वप्नीलने अखेर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.


पुण्यात काश्मिरी महिलेचा विनयभंग; अवघ्या ३६ तासांत न्यायालयाने दोषींना सुनावली शिक्षा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -