घरमहाराष्ट्रRamdas Tadas : उद्धव ठाकरे किती खालच्या पातळीचे राजकारण करतायत, चित्रा वाघांचा...

Ramdas Tadas : उद्धव ठाकरे किती खालच्या पातळीचे राजकारण करतायत, चित्रा वाघांचा हल्लाबोल

Subscribe

वर्ध्यातील भाजपा उमेदवार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे होत्या. यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

मुंबई : भाजपा खासदार आणि महायुतीचे वर्ध्यातील उमेदवार रामदास तडस यांच्या कुटुंबीयांकडून माझ्यावर अन्याय झाला. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला गेला. तसेच, मला लोखंडी रॉडने मारण्यात आल्याचा आरोप रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी केला आहे. यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत, हे यावरून दिसत असल्याची टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. (Tadas case: Uddhav Thackeray accused by Chitra Wagh)

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी (Chitra Wagh) ट्वीट केले आहे. रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्याविरोधात काहीच सापडत नाही म्हणून विरोधकांनी आता वैयक्तिक वाद उकरून काढण्याचे काम सुरू केले आहे. लोकसभा निवडणूक सुरू असतानाच रामदास तडस यांच्याविरोधात आरोप कसे काय केले जातात? हा प्रश्न आहे. रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करणे, यातूनच कौटुंबिक कलहाचा उपयोग राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

- Advertisement -

कौटुंबिक वादाचा वापर राजकीय मुद्द्यासाठी (Use of family disputes for politics)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सटरफटरांनी घर मोडण्यापेक्षा घर उभे करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. दुसऱ्याला नैतिकता शिकवण्याची उठाठेव करताना आपल्या स्वत:च्याच दिव्याखाली अंधार किती, याचा सटरफटरांनी विसर पडलेला दिसत आहे, असे सांगत चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, खरंतर, रामदास तडस यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. पण कौटुंबिक वादाचा वापर राजकीय मुद्द्यासाठी केला जात आहे, हे वाईट आहे. मुळात आत्ताच आरोप करण्याचा उद्देश काय आहे? लोकसभा निवडणुकीत उमेदवार असल्यामुळे हे प्रकरण उकरून काढले जात आहे का? असा संशय येतो.

- Advertisement -

हेही वाचा – Pankaj Tadas: बाळाच्या DNA टेस्टसाठी दबाव; पत्नीच्या आरोपांवर पती पंकज तडस यांचं उत्तर, म्हणाले…

रामदास तडस यांच्या सूनेने कधी साधी नगरपालिका लढविली नाही, त्या अचानक लोकसभेसाठी अर्ज करतात यामागे कोण सूत्रधार आहे, हे पण समोर यायला पाहिजे. पण राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या चेलेचपाटे सटरफटरांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या, हे मात्र नक्की, असे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे तडस प्रकरण?

भाजपाचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पत्रकार परिषद घेत तडस कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला गेला. तसंच, मला लोखंडी रॉडने मारण्यात आल्याचा आरोप रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी केला. लग्नानंतर मला एका रुममध्ये ठेवले. मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आले. त्यातून बाळाचा जन्म झाला. परंतु खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाळाची डीएनए चाचणी करण्यास सांगितले. मी मुलाला बेदखल केल्याचे रामदास तडस सांगतात, त्यांनी मुलाला घरातून काढले नाही, पण मला घराबाहेर काढल्याचा दावा त्यांनी केला. आता त्यांनीसुद्धा वर्ध्यातून अपक्ष लढणार असल्याचीही घोषणा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -