घरराजकारणPankaj Tadas: बाळाच्या DNA टेस्टसाठी दबाव; पत्नीच्या आरोपांवर पती पंकज तडस यांचं...

Pankaj Tadas: बाळाच्या DNA टेस्टसाठी दबाव; पत्नीच्या आरोपांवर पती पंकज तडस यांचं उत्तर, म्हणाले…

Subscribe

आधी DNA टेस्ट कर, असा दबावही माझ्यावर टाकण्यात आल्याचं, पूजा तडस यांनी म्हटलं आहे. त्यांनी केलेले आरोप त्यांचे पती आणि रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी फेटाळले आहेत.

नागपूर: भाजपाचे वर्धा लोकसभेचे उमेदवार असलेले रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. माझं बाळं कोणाचं आहे, अशी मला ते विचारणा करतात. आधी DNA टेस्ट कर, असा दबावही माझ्यावर टाकण्यात आल्याचं, पूजा तडस यांनी म्हटलं आहे. त्यांनी केलेले आरोप त्यांचे पती आणि रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी फेटाळले आहेत. (Pankaj Tadas Push for baby DNA test Husband Pankaj Tadas s reply to his wife Pooja Tadas)

काय म्हणाले पंकज तडस?

बाळाच्या डीएनए चाचणीवर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने उत्तर देण्यास पंकज तडस यांनी नकार दिला आहे. पंकज तडस म्हणाले, विरोधकांनासोबत घेऊन सुरू असलेला सुनियोजीत प्लान आहे. लोकसभेत उभं राहायचं तर लोकसभेला उभं राहण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी पैसा येतो कुठून? यामध्ये दोन मोठ्या राजकारणी सहभागी आहेत. रामदास तडस यांचे तिकीट कापण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. माझ्याकडे या संदर्भात पुरावे आहेत. 2019 आणि 2024 साली देखील हा प्रयत्न केला होता. विरोधकांचे षडयंक्ष असून विरोधकच सगळा मालमसाला पुरवत आहेत. आमची तिकीट कसं कापलं जाईल, यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. शंभर टक्के विरोधकांचा राजकीय डाव आहे.

- Advertisement -

परिवाराला बदनाम करण्याचा डाव

मोदींकडे जाण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. मोदींकडे जरी पुजा गेल्या तरी खंडणी प्रकाराच्या 10 हजार कागदपत्रांचा पुरावा आणि दोन हजार ऑडिओ क्लिप मोदींकडे देण्यास तयार आहे. माझ्याकडे फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्टही आहेत. ही हनीट्रॅपचा प्रयत्न आहे. हनी ट्रॅपच्या 2 हजार ऑडिओ क्लिप्स आहेत. विरोधकांचा आधार घेत प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचं पंकज तडस यांनी म्हटलं आहे.

( हेही वाचा: Ramdas Tadas : ती महिला आता विरोधकांसोबत; पूजा तडस यांच्या आरोपांवर रामदास तडसांचा प्रत्यारोप)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -