घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये पुन्हा फुटला तलाठी परीक्षेचा पेपर?; तरुणीकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस?

नाशिकमध्ये पुन्हा फुटला तलाठी परीक्षेचा पेपर?; तरुणीकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस?

Subscribe

नाशिक : म्हसरूळमध्ये गेल्या महिन्यात तलाठी पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी (दि.५) पुन्हा म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील नामांकित शैक्षणिक संस्थेत पेपर फुटीचा प्रकार घडली. परीक्षा केंद्रात एका परीक्षार्थी तरुणीकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असल्याचा प्रकार परीक्षार्थीमुळे उघडकीस आला आहे. मात्र, या प्रकरणात संबंधित संस्थेतील अधिकार्‍यांकडून संस्थेत असा काही घडला नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे पेपर फुटीप्रकरण गुलदस्त्यातच राहिली आहे. या प्रकारामुळे केंद्रावर गोंधळ झाला.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात कामकाज सुरू आहे. गेल्या महिन्यात दिंडोरी रोडवरील रिलायंस पेट्रोल पंप जवळील वेबईजी परिक्षा केंद्रात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा केंद्रा बाहेरून एका संशयितास वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब मोबाईलसह सुक्ष्म श्रवणयंत्र ताब्यात घेतले होते. हे प्रकरण ताजे असतानाच मंगळवार (दि.०५) रोजी दिंडोरी रोडवरील रिलायन्स पंपामागील एका नामांकित शैक्षणिक संकुलात दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान तलाठी पेपर सुरू होता.

- Advertisement -

या संकुलातील ब्लॉक न. १०१ क्रमांकामध्ये परिक्षा संपण्याच्या शेवटचा अर्धा तास बाकी असताना महिला पर्यवेक्षिका यांना एका परीक्षार्थी मुली कडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सापडले. यावेळी संबधित महिला पर्यवेक्षिका यांनी इतर ब्लॉक मधील सहकारी पर्यवक्षकांना बोलावून घेत ते जप्त केले. त्यानंतर संबधीत परीक्षार्थी मुलीस बाहेर काढण्यात आले, अशी माहिती परीक्षार्थी मंगेश साळवे यांनी दिली. ज्यावेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पेपर देण्यासाठी जातो. त्यावेळी काही परीक्षार्थी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस परीक्षा केंद्रामध्ये घेऊन कसे जातात, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. यात परीक्षा केंद्र की परीक्षा केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था दोषी आहे. असे अनेक प्रश्न अभ्यास करून परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्याला पडले आहेत.

पेपरफुटीची अफवा

तलाठी पेपर सुरू असताना शेवटचे २०-२५ मिनिटे बाकी होते. त्यावेळी काही परीक्षार्थींनी केंद्रात गैरप्रकार झाला असून, सर्वांची तपासणी करावी अशी मागणी केली. त्यानुसार सर्व परीक्षार्थींची तपासणी केली असता कुठलीही वस्तू सापडली नाही. ज्या मुलीवर संशय व्यक्त करण्यात आला होता, तिच्याकडे काहीही सापडले नाही. गैरप्रकार झाल्याबाबत अफवा होती, अशी माहिती मनोज भालेराव यांनी दिली.

- Advertisement -

सीसीटीव्हीची तपासणी करा

परीक्षार्थी साळवे यांनी ब्लॉक क्रमांक १०१ चे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावेत. त्यात सर्व प्रकार उघड होईल, असे आवाहन केले आहे. त्यामुळे अभ्यास करून परीक्षेची तयारी करणार्‍यांना न्याय मिळेल आणि कॉपीबहाद्दर या प्रक्रियेतून बाहेर पडतील, असेही परीक्षार्थी साळवे याने सांगितले.

कॉपीच्या प्रकरणाबद्दल कोणत्याही प्रकारची लेखी किंवा तोंडी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल नाही. त्यामुळे असा काही कॉपीचा प्रकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे, याची माहिती नाही. : राजू पाचोरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -