घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये मंदिराचा दगडी सभामंडप कोसळला; तिघांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये मंदिराचा दगडी सभामंडप कोसळला; तिघांचा मृत्यू

Subscribe

महादेव मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरू होते. अचानक मंदिराचा दगडी सभामंडप कोसळला. या दुर्घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर, नऊ कामगार जखमी झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरात नदीच्या कडेला महादेव मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरू असताना मंदिराचा सभामंडपाचा दगडी स्लॅब कोसळला. ही घटना बुधवारी दुपारी पाऊने चारच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर, नऊ कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिदम्मा पुजारी (वय ३०), मंतोष संजीत दास ( वय ३०) आणि प्रेमचंद शिबू राजवार (वय ३५) सह १२ जण पिंपळे गुरव येथील नदी काठच्या महादेव मंदिराचे जिर्णोधाराचे काम करत होते. भल्या मोठ्या दगडी खांबाचे सभामंडप बांधण्याचे काम सुरू होते. काही कामगार हे मंदिराच्या बाहेरून आत दगड आणून टाकत होती. तर त्याचवेळी टेकू असलेले लोखंडी रॉड आणि लाकडी बांबू काढून घेतले जात होते. तेव्हाच घात झाला आणि सर्वच दगडी सभामंडपाचे छत कोसळून कामगारांच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत ऐकून १२ जण अडकले होते. त्यातील तीन जणांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. संबंधित, जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, हे मंदिर अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अग्निशमन दल आणि सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल होते. या घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

मंदिर जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं. या बांधकामाची परवानगी संबंधितांनी पालिकेकडे घेतली नव्हती. तशी त्यांना नोटीस ही देण्यात आली होती. आता चौकशी समिती स्थापन करून दोषींवर कारवाई करू. तसेच याच चौकशीत हे बांधकाम पुर रेषेच्या आत केले जात होते का हे निष्पन्न होईल
– श्रावण हर्डीकर, पालिका आयुक्त
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -