घरक्राइमडोंबिवलीत भयंकर घटना

डोंबिवलीत भयंकर घटना

Subscribe

कौटुंबिक वादातून लिंग कापले

डोंबिवली । डोंबिवलीतील कल्याण-शिळ मार्गावरील गोळवली गावात राहणारा संजयकुमार मुनशी राम (39 ) याचे घरगुती वादातून घरातील इतरांशी मोठा वाद झाला. घरातील तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण करीत लिंग कापण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. जखमी संजयकुमारची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गोळवली येथील शंकरशेठ चाळीत जखमी संजयकुमार आणि हल्लेखोर एकत्रच राहत होते. ते एकमेकांचे नातेवाईक होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास संजयकुमार आणि इतर तिघांमध्ये कौटुंबिक वाद झाला. हा वाद पराकोटीला गेला.तिघांनी मिळून संजयकुमार याला बेदम मारहाण केली. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे संजयकुमार यांचे लिंग कापण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी संजय कुमार याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

- Advertisement -

जखमी संजयकुमार याने दिलेल्या जबानीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार सोनूकुमार सियाराम राम (32 ) करण राम आश्रयराम राम (28 ) आणि सुरेंद्रकुमार रमेश राम (35 ) या तिघांना ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप या हल्याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -