घरमहाराष्ट्रआरोपांची राळ उडवली पण, मल्टीस्टेटच्या मुद्द्यावर अडकला विरोधकांचा प्रचार

आरोपांची राळ उडवली पण, मल्टीस्टेटच्या मुद्द्यावर अडकला विरोधकांचा प्रचार

Subscribe

गोकुळच्या निवडणुकीत मल्टिस्टेट हा मुद्दाच मांडला जातो आहे. यामुळे विरोधकांकडे प्रचारासाठी दुसरे कोणतेही मुद्दे शिल्लक नसल्याचे बोलले जात आहे.

राज्यात सहकारातील विशेषतः दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य गोकूळ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर आरोपांची राळ उडवली आहे. या प्रचारात गोकुळच्या मल्टिस्टेटचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. विशेष म्हणजे निकालात निघालेला हा मुद्दा विरोधकांकडून का चर्चेला आणला जातो आहे, याचा आता मतदारांनाच प्रश्न पडला आहे.

गोकुळच्या निवडणुकीत विरोधक आघाडीकडून सत्ताधार्‍यांवर भ्रष्टाचारासह अन्य आरोप केले जातील, अशी मतदारांची अपेक्षा आहे. कोणत्याही निवडणुकीत पारंपरिकपणे याच धर्तीवर प्रचार केला जातो. मात्र, गोकुळच्या निवडणुकीत मल्टिस्टेट हा मुद्दाच मांडला जातो आहे. यामुळे विरोधकांकडे प्रचारासाठी दुसरे कोणतेही मुद्दे शिल्लक नसल्याचे बोलले जात आहे. त्यातही गोकुळला मल्टिस्टेटचा दर्जा मिळावा, अशी मागणी करणारा ठराव तत्कालिन संचालक विश्वास पाटील यांनी मांडला होता. तर त्याला विरोध अरुण डोंगळे यांनी केला होता. दोन्ही संचालक हे विरोधकांच्या आघाडीत आहेत. त्यामुळे मल्टिस्टेटचा मुद्दा कशाच्या आधारावर उपस्थित केला जातो आहे हा प्रश्न आहे.

- Advertisement -

विरोधक आणि सत्ताधारी दोघेही विकासाच्या मुद्यावर बोलत आहेत. यात गोकुळची नेहमीच अमुलशी तुलना केली जाते. मात्र, अमूलच्या यशाचे गमक हे बहुराज्यीय झाल्यामुळे गोकुळच्या विकासासाठी अधिक संकलन आणि विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागेल. त्यासाठी गोकुळला बहुराज्यीय केल्याशिवाय पर्याय नाही. एकीकडे म्हशीने दुध दिले पाहिजे अशी अपेक्षा करायची आणि दुसरीकडे तिला खाऊ घालायचे नाही, असा विरोधकांच्या प्रचारातला विरोधभास दिसून येतो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -