घरमहाराष्ट्रकॉंग्रेसच्या पुण्याईवर देश चालला आहे,मोदी सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज..संजय राऊत

कॉंग्रेसच्या पुण्याईवर देश चालला आहे,मोदी सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज..संजय राऊत

Subscribe

मोदी सरकारला देशासाठी खूप काही करने बाकी आहेत तसेच. कॉंग्रेस सरकार असताना झालेल्या कामामुळे देशाचा कारभार आज सुरळीत आहे असे संजय राऊत म्हणाले.

मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना मोदी सरकारच्या कामाचा पाढा वाचला आहे तसेच मोदी सरकारच्या कारभारा विषयी भाष्य केलं आहे. गेल्या सात वर्षांपैकी पाच वर्षे सरली आणि दोन वर्षे कोरोना महामारीत गेली मोदी सरकारला देशासाठी खूप काही करने बाकी आहेत तसेच. कॉंग्रेस सरकार असताना झालेल्या कामामुळे देशाचा कारभार आज सुरळीत आहे असे संजय राऊत म्हणाले. इतकच नाही तर राहुल गांधी यांचे म्हणणे गंभीरतेने ऐकून घ्यावे असेही ते म्हणाले. देशात आजही कोरोनामुळे अराजकता,महागाई,बेरोजगारी पसरलेली आहे. गेल्या सात वर्षात जनतेला काही मिळाले आहे का? जवाहरलाल नेहरू पासून ते नरसिंह राव यांचा कामाचा लेखा जोखा पहिला तर मागच्या पुण्याई वर देश चालत असल्याचे संजय राऊत म्हणाले. मोदी सरकारने आत्मचिंतन करायला हवे. सरकारला सात वर्षे पूर्ण झाली तरी अनेक कामे प्रलंबित असल्याची टीका संजय राऊत यांनी  केली.
मोदी सरकारने वादळा दरम्यान करण्यात आलेल्या राज्य आढावा दौर्‍यासांदर्भात मोदी सरकारची भूमिका फक्त विशिष्ट राज्य सांदर्भात होती का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, राज्य सरकारचे पालन करने हे केंद्राचे कर्तव्य आहे. केंद्राने स्वत: वाद उकरून काढू नये.
तसेच ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे सरकारने कानाडोळा करून चालणार नाही . पश्चिम बंगाल आणि केंद्रातील संघर्ष कायम राहणार आहे. केंद्र राज्याचे पालक आहेत. त्यामुळे केंद्राने जुने मतभेद बाजूला सारले पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना बोलावलं नाही ही गोष्ट चुकीची आहे असे मत संजय राऊत यांनी मांडले


हे हि वाचा –मोदी सरकार हे देशातील कमजोर सरकार, काँग्रेसचे टीकास्त्र

- Advertisement -

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -