घरमहाराष्ट्रपुणेअन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, 22 लाखांचे बनावट मिल्क प्रॉडक्ट्...

अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, 22 लाखांचे बनावट मिल्क प्रॉडक्ट् जप्त

Subscribe

पुणे – अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गेल्या 15 दिवसात तिसऱ्या बनावट पनीर कारखान्यावर कारवाई केली. बनावट पनीर तयार करणाऱ्या कोंढवा येथील सद्गुरुकृपा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स कारखान्यावर छापा मरला. यावेळी २,३९,८०० रुपये किमतीचे ११९९ किलो पनीर एफडीएने जप्त केले.

एफडीऐ अधिकाऱ्यांनी छाप्यात पनीरसह 18 लाख रुपये किमतीचे 4073 कोलो स्किम्ड मिल्क पावडर, 153765 रुपये किमतीचे 1048 किलो आर बी डी पोमोलीन तेल असा एकून 22 लाख 65 हजार 217 रुपये किंमतीचा साठा जप्त केला. या कारवाईत आतापर्यंताच बनावट पनीरचा सर्वात मोठी साठा एफडीएने जप्त केला आहे.

- Advertisement -

एफडीऐने 15 दिवसात ही 3 री कारवाई केली आहे. यापूर्वी वानवडी येथे बनावट पनीर तयार करणाऱ्या मे टीप टॉप डेरीवर छापा टाकत 3 लाख 29 हाजार 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. पहिली कारवाई ही हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारत 29 हजार 400 रुपयांचा माल जप्त केला होता. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे की अशाप्रकारचे बनावट पनीर तुमच्या नजरेस आढळल्यास त्वरित आम्हाला संपर्क करावा.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -