घरक्राइम'ससून'चे अधिष्ठाताच दोषी! ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणातील मोठी अपडेट

‘ससून’चे अधिष्ठाताच दोषी! ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणातील मोठी अपडेट

Subscribe

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणावरून राज्य सरकारला वेठीस धरले होते.

पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात आज शुक्रवारी (10 नोव्हेंबर) मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला. त्यामध्ये ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर दोषी आढळले असून, त्यांच्यासमवेत अस्थिव्यंगोपचार पथक प्रमुख डॉ. देवकाते हेसुद्धा दोषी आढळले आहे. या दोन्ही वरिष्ठ अधिकारी डॉक्टरांचे निलंब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (The founder of Sassoon is guilty! Big update on drug mafia Lalit Patil case)

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणावरून राज्य सरकारला वेठीस धरले होते. यामध्ये सुषमा अंधारे यांनी गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. दरम्यान राज्य सरकारने या सर्व प्रकणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. त्या समितीने संपूर्ण चौकशी करून आज शुक्रवारी त्यांचा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. यामध्ये ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि अस्थिव्यंगोपचार पथक प्रमुख डॉ. देवकाते हे दोषी आढळल्याची माहिती समोर आली. ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणातील ही सर्वात मोठी अपडेट आज समोर आली असून, संजीव ठाकूर यांची आता विभागीय समिती मार्फत चौकशी होणार असल्याचीही माहिती आहे. तर संजीव ठाकूर यांची आजच अधिष्ठता पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती हे विशेष.

- Advertisement -

हेही वाचा : तिकीट घेऊन कीर्तीकर पक्षाशी गद्दारी करतील! शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना संशय

आधीच्या डीनचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बळकावली होती खूर्ची

संजीव ठाकूर यांच्यावर शुक्रवारी झालेल्या कारवाईनंतर त्यांच्याबाबतील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ.विनायक काळे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याधीच त्यांची त्यांची ससून रुग्णालयाच्या महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात काळे यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. मॅट कोर्टाने संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द केली. त्यानंतर आता हायकोर्टानेदेखील तसाच निर्णय दिला आहे. त्यामुळे संजीव ठाकूर यांचं डीन पदाची खुर्ची कायदेशीररित्या आधीच गेलीय. त्यानंतर आता त्यांचं सरकारकडून निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवारांनंतर अमित शहांचीही घेतली अजितदादांनी भेट; कारण अद्यापही गुलदस्त्यात

दोषी आढळण्याधीच मुंबई उच्च न्यायालयाने दिला दणका

ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी नाशिकच्या ललित पाटीलला अटक केली. नऊ महिने ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्करी करत असल्याचा आरोप ललित पाटीलवर आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांचे नाव समोर आले आहे. विरोधकांकडून याप्रकरणी सरकारला सातत्याने लक्ष केले जात असतानाच आता ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. ठाकूर यांना दणका देत त्यांची नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरण डॉ. संजीव ठाकूर यांच्या अंगाशी आल्याची सध्या चर्चा सुरू असली तरी हे प्रकरण वेगळे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -