Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी MBBS आणि MD च्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय...

MBBS आणि MD च्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाचा मोठा निर्णय

अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने माध्यमिक आणि उच्च शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लोकसेवा आयोगानेही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानंतर आता वैद्यकीय विभागाच्या MBBS आणि MD च्या परीक्षा पुढे ढकलल्या असून जूनच्या पहिल्या आठवड्यापासून घेण्यात येणार आहेत. वैद्यकीय विभागाच्या एमबीबीएस आणि एमडीच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या, सीबीएसई, आयसीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करुन बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मेच्या अखेरीस व जूनमध्ये परीक्षा वेळापत्रक जाहीर करुन घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

वैद्यकीय विभागाच्या MBBS आणि MD च्या परीक्षा घेण्यात येणार होत्या परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. मागील वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता त्यामुळे वैद्यकीय विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्यतील दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी त्यांना इंटरनल असेसमेंटच्या आधारावर पास करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर येणजाणं होणार तसेच यामध्ये अनेक अडचणी होत्या त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

- Advertisement -