घरदेश-विदेशहिवाळी अधिवेशनात मल्टिस्टेट बँकेचा कायदा करणार

हिवाळी अधिवेशनात मल्टिस्टेट बँकेचा कायदा करणार

Subscribe

काहीजण बँक लुटून जातात पण त्याचा फटका लाखो ठेवीदारांना बसतो. पीएमसी बँकेबद्दल तसेच झाले आहे. भविष्यात किमान लाखो ग्राहक असलेल्या मल्टिस्टेट बँकेबद्दल तरी असे होऊ नये म्हणून येत्या हिवाळी अधिवेशनात मल्टिस्टेट बँकेचा कायदा करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

सीतारामन शुक्रवारी पुण्यात आल्या होत्या. पत्रकार परिषदेत त्यांना पीएमसी बँकेबद्दल पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या की, मुंबईत पीएमसी बँकेचे खातेधारक आल्याचे समजल्यावर मी त्यांना भेटायला बोलावले. काहीजण बँक लुटून गेले आणि आता लाखो ठेवीदार अडचणीत आहेत.

- Advertisement -

पीएमसी ही बहुराज्यीय सहकारी बँक आहे. मी आरबीआयच्या गव्हर्नरशी संपर्क केला असून लवकरात लवकर पीएमसी बँकेची प्रक्रिया पूर्ण करायला आहे. भविष्यात बँकांच्या ग्राहकांना अडचण येऊ नये म्हणून येत्या हिवाळी अधिवेशनात मल्टिस्टेट बँकेचा कायदा करणार आहोत. ज्यात सर्वसामान्य भरडले जातात, त्या बँकांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असेही सीतारामन म्हणाल्या. अमेरिका आणि भारतामधील व्यापारसंबंध सुधारतील.

व्यापार आणि आर्थिक निर्णयांविषयी अर्थमंत्रीच निर्णय घेतील. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची केमिस्ट्री उत्तम होती, हे सगळ्यांनी बघितलंय. आम्ही शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाची उत्तम किंमत देऊ इच्छितो. कांदे आणि लसूण टिकावेत म्हणून काही करता येईल का, यासाठी भामा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधन सुरू आहे. त्यामुळे सरकारला दोषी धरणे चुकीचे आहे, असेही सितारमण यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -