Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम परमबीर सिंग यांची चार तर प्रदीप शर्मा यांची साडे आठ तास NIA...

परमबीर सिंग यांची चार तर प्रदीप शर्मा यांची साडे आठ तास NIA मार्फत चौकशी

Related Story

- Advertisement -

मुकेश अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए कडून मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चार तास तर माजी पोलीस अधिकारी यांची तब्बल साडे आठ तास चौकशी करण्यात आली आहे. सकाळी एनआयएच्या कार्यालयात आलेले परमबीर सिंग हे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. तर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयात हजर झाले होते.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्या प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याच तपास एनआयए या तपास यंत्रणकडे आहेत. हे दोन्ही घटना घडल्या त्यावेळी परमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. पोलीस आयुक्त असतांना सचिन वाझे हे परमबीर सिंग यांना गुन्हाचा आणि तपासाचा संपूर्ण माहिती देत होते. या प्रकरणाशी परमबीर सिंग यांचा थेट संबध आल्यामुळे त्यांना एनआयए चौकशीसाठी बुधवारी एनआयए कार्यालयात बोलावण्यात आले होते. बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास परमबीर सिंग हे स्वतःच्या वाहनातून एनआयएच्या कार्यलयात दाखल झाले होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ते एनआयएच्या कर्यालयांतून बाहेर पडले, परमबीर सिंग यांची तब्बल चार तपास एनआयए कडून चौकशी करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना देखील एनआयए चौकशीसाठी बोलावले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एनआयए कार्यालयात दाखल झालेले प्रदीप शर्मा रात्री ९ वाजता एनआयए कार्यलातून बाहेर पडले. प्रदीप शर्मा यांच्याकडे एनआयए कडून तब्बल साडे आठ तास चौकशी करण्यात आली. मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणानंतर प्रदीप शर्मा हे वाझे याच्या संपर्कात होते असा संशय एनआयएला आहे. तसेच ३ मार्च रोजी सचिन वाझे, विनायक शिंदे आणि गुन्हे शाखेतील एक अधिकारी असे तिघेजण अंधेरी पूर्व जे.बी नगर परिसरात भेटले होते, ती भेटणारी व्यक्ती प्रदीप शर्मा होती का? असा संशय देखील एनआयए ला असून या अनुषंगाने प्रदीप शर्मा यांना चौकशी साठी बोलावण्यात आले होते अशी माहिती सूत्रांची दिली आहे.

 

- Advertisement -