घरताज्या घडामोडीपोलीस आयुक्तांसह महापालिका आयुक्तांनी केली प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी

पोलीस आयुक्तांसह महापालिका आयुक्तांनी केली प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी

Subscribe

नाशिक शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची बुधवारी (दि.७) महापालिका आयुक्त कैलास जाधव व पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पाहणी केली. यावेळी प्रतिबंधित क्षेत्रातील विविध कामांच्या सूचना दोघांनी महापालिका व पोलीस अधिकार्‍यांना दिल्या.

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत, त्याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात येत आहेत. या ठिकाणी करण्यात आलेल्या नियोजनाची महापालिका आयुक्त कैलास जाधव व पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केली. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या ठिकाणी काम करत असलेल्या एन. एम. ए. , आशासेविका, वैद्यकीय पथक व पोलीस पथकाशी चर्चा केली. तसेच रुग्ण व परिसरात रहिवाशांची अँटीजेन व आर.टी.पी.सी.आर. तपासणी बाबतच्या सूचना दिल्या. या चाचण्या वाढविणे, होम आयसोलेशन फॉर्म भरून घेणे, प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व प्रतिबंधित क्षेत्रात रहिवाशांना दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, प्रतिबंधित क्षेत्रातील रस्त्यांचे बॅरिकेटिंग करत बंद करण्याची व्यवस्था करावी. प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरातील फलकावर संपर्क क्रमांक, प्रतिबंधित क्षेत्राचा प्लॅन आदी माहीती लावण्याच्या व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

- Advertisement -

नवीन नाशिक परिसरातील शारदा निकेतन, गोविंद नगर, श्रीलोक अपार्टमेंट, निसर्ग कॉलनी, पाथर्डी फाटा, गणेश दर्शन रोहाऊस,गजानन मंदिर, स्वामी समर्थ केंद्रा जवळ, पाथर्डी फाटा, सातपूर विभागातील सप्तशृंगी अपार्टमेंट, नवजीवन रुग्णालयाशेजारील जाधव संकुल, अशोकनगर, नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयांतर्गत दत्त लक्ष्मी अपार्टमेंट, चैतन्य नगर, गोंदवेलकर महाराज मंदिराजवळ, नाशिकरोड विभागातील वरदहस्त अपार्टमेंट आयोध्या नगरी व हार्मोनी बिल्डिंग, उपनगर, वसंत दीप सोसायटी जेलरोड, पंचवटीतील ब्रह्माणी पार्क, महाराष्ट्र कॉलनी हिरावाडी रोड, पंचवटी येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. या पाहणीच्या वेळी आयुक्त जाधव व पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या समवेत पोलीस उपायुक्त अमोल तांबे, महापालिका उपायुक्त प्रदीप चौधरी, करुणा डहाळे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, विभागीय अधिकारी मयुर पाटील, महेंद्रकुमार पगारे, नितीन नेर, स्वप्नील मुदलवाडकर, डॉ. दिलीप मेणकर, कोरोना कक्ष प्रमुख आवेश पलोड, डॉ.विजय देवकर, डॉ. जगताप, डॉ.जितेंद्र धनेश्वर, पोलीस निरीक्षक अशोक भगत, विजय ढमाले, उपअभियंता जितेंद्र पाटोळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -