घरमहाराष्ट्रव्हॉटअॅपवरुन अश्लील व्हिडिओ पाठवणारा गजाआड

व्हॉटअॅपवरुन अश्लील व्हिडिओ पाठवणारा गजाआड

Subscribe

व्हॉटसअॅपवरुन महिलांना अश्र्लील फोटो पाठवणाऱ्या तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. जय दादू चौहाण (२३) असे या तरुणाचे नाव आहे.

व्हॉट्सअॅपवरून महिलांना अश्लील व्हिडिओ, फोटो आणि मेसेज पाठवणाऱ्या माथेफिरु तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. जय दादू चौहाण (२३) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण स्वत:च्या मोबाईल वरुन अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवायचा.

नेमके काय आहे प्रकरण?

आरोपी महिलांचे मोबाईल नंबर शोधून काढायचा. त्या नंबरवर आरोपी स्वत:च्या मोबाईल वरुन अश्लील व्हिडिओ, मेसेज आणि फोटो काढून महिलांना पाठवायचा. हा विकृत आरोपी त्या महिलांकडे सेक्स चॅटची मागणी देखील करायचा. असेच या तरुणाने दोन महिलांना अश्लील व्हिडिओ आणि मेसेजेस पाठवले होते. त्यानंतर या महिलांनी नगरच्या पोलिस ठाण्यात धाव घेत या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर या तरुणाला शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी जय दादू चौहाण या आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा, विनयभंग या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याजवळील मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -