घरमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशन 2023विधानसभेतील ध्वनिक्षेपक यंत्रणा सदोष; आमदारांच्या भाषणात आवाजाचा अडथळा

विधानसभेतील ध्वनिक्षेपक यंत्रणा सदोष; आमदारांच्या भाषणात आवाजाचा अडथळा

Subscribe

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा सभागृहात कोट्यवधी रुपये खर्चून बसविलेली ध्वनिक्षेपक यंत्रणा सदोष असल्याची खात्री सोमवारी पटली. ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांतील आमदारांनी खाली बसूनच सदोष ध्वनिक्षेपक यंत्रणेबद्दल नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Monsoon Session 2023 : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा सभागृहात कोट्यवधी रुपये खर्चून बसविलेली ध्वनिक्षेपक यंत्रणा सदोष असल्याची खात्री सोमवारी पटली. आवाज व्यवस्थित न येणे, बोलताना मधूनच कानाला त्रास होईल इतका आवाज मोठा होणे यामुळे आमदारांच्या भाषणात अडथळा आणला. ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांतील आमदारांनी खाली बसूनच सदोष ध्वनिक्षेपक यंत्रणेबद्दल नाराजी व्यक्त केली. (The sound system in the assembly is faulty; Voice interference in MLA’s speech)

हेही वाचा – शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारांच्या प्रश्नांवरून अंबादास दानवे सरकारवर संतापले

- Advertisement -

विधानमंडळाने बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तंत्राची कास धरली आहे. त्यानुसार विधानसभा सभागृहात आमदारांना दिल्या जाणाऱ्या लॅपटॉपची जागा आता ‘हायब्रिड मल्टिमिडीया कॉन्फरन्सिंग’ प्रणालीने घेतली आहे. या प्रणालीमध्ये सभागृहात आमदारांची होणारी भाषणे रेकॉर्डिंग होणार असून सभागृहातील कामकाजाच्या चित्रणाबरोबरच सदस्यांना कामकाजाची रूपरेषा आणि कागदपत्रेही बसल्याजागी एका क्लिकवर पाहता येणार आहेत. तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणाही नवीन बसविण्यात आली आहे.

मात्र, आठवडाभरातच ध्वनिक्षेपक यंत्रणेतील दोष समोर आले आहेत. काँग्रेसचे सुभाष धोटे, पी. एन. पाटील, भाजपचे समाधान अवताडे यांना आज (ता. 24 जुलै) सभागृहात बोलताना ध्वनिक्षेपकाच्या आवाजाचा त्रास झाला. आमदार नेमके काय बोलत आहेत? हे बराच वेळ समजत नव्हते. यावर दोन्ही बाजूच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. खरेतर सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ध्वनिक्षेपक यंत्रणेची चाचणी घेतली जाते. यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड आहे का, हे तपासले जाते. तरीही आज सभागृहात आपले म्हणणे मांडताना आमदारांना ध्वनिक्षेपकाचा त्रास झाला.

- Advertisement -

बाळासाहेब थोरांताचा सरकारला इशारा…

दरम्यान, आज विधानसभेत असमान पद्धतीने झालेल्या निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विरोधक संतापलेले पाहायला मिळाले. सत्ताधारी पक्षात असलेल्या ज्या आमदारांना मंत्रिपद मिळू शकले नाही, अशांना भरपूर निधी दिला. फुटलेल्या आमदारांसाठी आणि आपले आमदार संभाळण्यासाठी पुरवणी मागणीच्या निधीचा वापर करण्यात आला, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत केला. निधी वाटपात आमदारांना डावलणे हा नागरिकांवर अन्याय आहे. त्यामुळे हा अन्याय दूर झाला नाही तर न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा थोरात यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -