घरताज्या घडामोडीनियतीचा खेळ! कुत्र्याला वाचवायला गेला आणि पत्नीसह मुलांना गमावून बसला

नियतीचा खेळ! कुत्र्याला वाचवायला गेला आणि पत्नीसह मुलांना गमावून बसला

Subscribe

कुत्र्याला वाचवणाच्या नादात संपूर्ण कुटुंब गमावल्याची वेळ कोतवाल कुटुंबावर आली आहे.

एकीकडे प्राणीमात्रांची निर्घृण हत्या केली जात असताना दुसरीकडे मात्र, त्याच प्राण्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीने आपले संपूर्ण कुटुंब गमावले आहे. पुण्याच्या हवेली तालुक्यातील अष्टपूरजवळ ही घटना घडली आहे. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कोतवाल कुटुंबाची कार विहिरीत कोसळली असून यामध्ये आईसह दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, पती या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.

नेमके काय घडले?

कोतवाल कुटुंबीय राहूच्या सासरवाडीतून घरी अष्टपूरच्या दिशेने जात असताना, त्यांनी मधला रस्ता पकडला. या रस्त्याला लागूनच पाण्याने भरलेली विहिर होती. दरम्यान, त्याचवेळी रस्त्यात एक कुत्रा आला. त्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत ही कार कोसळली. ही घटना मंगळवारी रात्री ११.३५ मिनिटांच्या सुमारास घडली आहे. या अपघातात केवळ सचिन कोतवाल वाचले आहेत. त्यांनी गाडी विहिरीत पडताच बाहेर उडी मारली. त्यानंतर मुलांना आणि पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीच्या काचा बंद असल्यामुळं त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.

- Advertisement -

गाडी विहिरीत कोसळल्यानंतर सचिन कोतवाल यांनी बराचवेळ मदतीसाठी आवाज देत होते. मात्र, आजूबाजूला वस्ती नसल्यामुळे त्यांना मदत मिळाली नाही. अखेर क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली. मात्र, तोपर्यंत सचिन कोतवाल यांची पत्नी आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; या अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. सचिन यांनी रस्त्यावर बसलेल्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. ‘रस्ता गावच्या सीमेवर आहे. हा रुंद रस्ता नाही ८ फूटपेक्षा जास्त नाही. रस्त्याच्या डाव्या बाजूला एक कुत्रा बसलेला होता. या कुत्र्याला वाचवण्यासाठी सचिनने पुढे जाण्याच्या प्रयत्नात आपली गाडी उजवीकडे वळवली आणि संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत गाडी कोसळली. दरम्यान, सचिनची पत्नी आणि तिचा मुलगा मागील सीटवर बसले होते तर सचिन आणि त्याची मुलगी कारच्या पुढच्या सीटवर होती. ते विहिरीत पडले हे सचिनला त्वरित लक्षात आले नाही आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – नुकसानग्रस्त कोकणवासीयांना स्लॅबची पक्की घरे बांधून देणार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -