घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगावकर्‍यांनी संपूर्ण गाव काढले विकायला; 'हे' आहे कारण...

गावकर्‍यांनी संपूर्ण गाव काढले विकायला; ‘हे’ आहे कारण…

Subscribe

नाशिक : देवळा तालुक्यातील संपूर्ण ‘माळवाडी गाव विकणे आहे’ असा ठराव करण्यासाठी बहुतांश शेतकरी, महिला सोमवारी (दि. ६) रोजी गावात उपस्थित होते. तसा ठराव करण्यात आला व तो केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अविनाश बागुल यांनी दिली. तालुक्यातील माळवाडी गावात सुमारे ५३४ हेक्टरवर शेतकरी आपला शेती व्यवसाय करत आहेत. त्यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी प्रमुख पीक कांद्याचे घेतले जात आहे. यात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून कोणत्याही शेती उत्पादित मालाला कवडीमोल भाव मिळत आहे.

माळवाडी आणि फुलेमाळवाडी गावासह देवळा तालुक्यातील कांदा या प्रमुख पिकावर शेतकरी आपला उदरनिर्वाह व भविष्य बघत आहे, यात शेतकरी कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाही शेती व्यवसायात उपलब्ध होत नाही. तसेच दैनंदिन गरजा व खासगी, सरकारी बँक कर्ज चुकती करण्यासाठी आज रोजी तर कुठलाही पर्याय उरला नसल्या कारणाने माळवाडी येथील संपूर्ण शेतकरी एकत्रित येऊन संपूर्ण गाव विकण्याचे ठरवले जात आहे. याकडे शासनाने शेतकर्‍यांच्या गरजा भागवण्यासाठी व कर्ज मुक्त करण्याइतके शेती उत्पादित मालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे ते सरकाने विकत घेण्याची मागणी शेतकरी प्रवीण बागुल, अमोल बागुल, राकेश सोनवणे, अविनाश बागुल आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisement -

माळवाडी गावातील ९५ टक्के शेतकरी कांदा उत्पादक आहेत. हे शेतकरी ग्रामस्थ मिळून शेती व्यवसायातून मोबदला मिळत नसल्याने गाव विक्रीचा ठराव करण्यासाठी जमले होते. या ठरावासाठी अमोल बागुल, प्रवीण बागुल, राकेश सोनवणे, अविनाश बागुल, अक्षय शेवाळे आदींनी सभा आयोजित करून सर्वानुमते तसा ठराव पास करून सर्व शेतकर्‍यांच्या सह्या घेतल्या आहेत.

कुठल्याही शेती मालाला भाव नाही, म्हणून उदरनिर्वाहासाठी आत्महत्या करण्यापेक्षा जमिनी विकून जगता यावे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी गाव विकण्याचा एकमताने ठराव करीत आहोत. यात केंद्र व राज्य शासनाने आमच्या जमिनी घेऊन आम्हला पैसे उपल्बध करून द्यावेत. : प्रवीण बागूल, सुशिक्षित बेरोजगार शेतकरी, माळवाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -