घरCORONA UPDATEकौतुकास्पद : लहानग्यांने बक्षिसाची रक्कम कोरोनाविरुद्ध लढाईसाठी दिली!

कौतुकास्पद : लहानग्यांने बक्षिसाची रक्कम कोरोनाविरुद्ध लढाईसाठी दिली!

Subscribe

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला मान देत एका लहान मुलाने बक्षिसाच्या रुपात मिळवलेली सर्व रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे.

जगभरात कोरोनाचे संकट ओढवले असून उपचारासाठी मोठ्या आर्थिक निधीची गरज आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करण्यास इच्छूक असलेल्या लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. धारावी झोपडपट्टी, वरळी या दाट लोकवस्ती असलेल्या भागात ही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील लॉकडाऊन वाढविण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करण्यास इच्छुक असलेल्या लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला मान देत एका लहान मुलाने बक्षिसाच्या रुपात मिळवलेली सर्व रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे.

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अनेकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत होत आहे. यात विशेष म्हणजे अवघ्या आठ वर्षांच्या बक्षिसापोटी मिळालेले १० हजार रुपये मुख्यमंत्री निधीस दिले आहेत. या लहानश्या ओंजळीतुन मोठी मदत केल्याने सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

संविधानने तलावात बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचवला

रेल्वेत मजुरी करणाऱ्या कुटुंबातील संविधान गडसिंग असे या मुलाचे नाव आहे. संविधान इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. काही दिवसांपूर्वी चाटगाव येथील तलावात एक शाळकरी मुलीला पाण्यात बुडण्यापासून संविधानने मोठ्या हिमतीने वाचविले होते. त्यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून संविधानचे कौतुक झाले होते. अनेकांनी त्याचा सत्कारही केला. त्याच्या या बहाद्दूरी बद्दल अनेकांनी बक्षीसही दिले होते. याच बक्षिसातून गोळा झालेली दहा हजार रुपये संविधानने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी दिले आहेत.

नावातच सर्व काही आहे

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे देखील चकित झाले. तुझ्या नावातच सर्व काही आहे संविधान, असे म्हणत मुंडे यांनी आभार व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -