घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'हर हर महादेव' लावल्यास परिणामांना चित्रपटगृह मालक जबाबदार; स्वराज्य संघटनेचा इशारा

‘हर हर महादेव’ लावल्यास परिणामांना चित्रपटगृह मालक जबाबदार; स्वराज्य संघटनेचा इशारा

Subscribe

नाशिक : स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केल्यानंतरच खर्‍या अर्थाने महाराष्ट्रात ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांवरून वादंग निर्माण झाला होता. याबाबत आता नाशिकमध्ये स्वराज्य संघटनाही आक्रमक झाली आहे. शहरातील उपनगर भागातील आयनॉक्स चित्रपटगृह परिसरात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी चित्रपटगृह व्यवस्थापनाला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो लावल्यास होणार्‍या परिणामांना तयार रहा असा इशारा देण्यात आला.

हर हर महादेव चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चुकीचा इतिहास दाखवण्याचे धाडस केले आहे. चित्रपटात मोठ्या प्रमाणात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. याबाबत स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तरीही त्याबाबत चित्रपट निर्मात्यांकडून चित्रपटात कोणताही बदल न करता चित्रपटगृहात सिनेमात दाखवण्यात येत होता. यामुळे स्वराज्य संघटनेच्या वतीने चित्रपटाला विरोध दर्शवण्यात आला आहे.

- Advertisement -

यासंदर्भात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दी.८) नाशिक-पुणे महामार्गावरील आयनॉक्स चित्रपटगृहावर धडक देत ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडला. यावेळी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. छत्रपती संभाजी महाराज की जय.. हर हर महादेव चित्रपट काढणाऱ्या दिग्दर्शकाचा धिक्कार असो अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली. यावेळी आयनॉक्स चित्रपटगृहाचे व्यवस्थापकांची भेट घेत अश्या पद्धतीचा चित्रपट पुन्हा लावण्यात येऊ नये. अन्यथा, होणार्‍या परिणामांना चित्रपटगृह मालक व व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला.

दरम्यान, यावेळी स्वराज्य संघटनेचे निमंत्रण गणेश कदम, केशव गोसावी, काकासाहेब पवार, ज्ञानेश्वर थोरात, यश बच्छाव, निखिल सातपुते, निखिल बोराडे, मनोज गायधनी, वैभव झाडे, विजय तुंगार, प्रवीण गोसावी, गणेश खराटे, प्रतीक कटारे, अक्षय निंबाळकर, ओम आहिरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -