घरताज्या घडामोडीस्वत:नेच लावलेला ट्रॅप भाजपानेच सोडवला', बाळा नांदगावकरांना 'त्या' ट्वीटवर सचिन सावंतांचा टोला

स्वत:नेच लावलेला ट्रॅप भाजपानेच सोडवला’, बाळा नांदगावकरांना ‘त्या’ ट्वीटवर सचिन सावंतांचा टोला

Subscribe

पुण्यात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी हजेरी लावली. त्यावेळी बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले.

पुण्यात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी हजेरी लावली. त्यावेळी बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंची भूमिका पटली असावी, अशा आशयाचं ट्वीट केले. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंतानी बाळा नांदगावकरांना टोला लगावला आहे. (Then Who Was The Author Of The Story Of The Movie Ayodhya The Trap Sachin Sawant Question To Bala Nandgaonkar)

“मग ‘अयोध्या दि ट्रॅप’ चित्रपटाच्या कथेचा रचेता कोण होता बरं? का ते पण नेहमीप्रमाणे मनसे? असो! भाजपाने लावलेला ट्रॅप भाजपानेच सोडवला असे दिसते!” असा टोला सचिन सावंत यांनी बाळा नांदगावकर यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना लगावला.

- Advertisement -

बाळा नांदगावकरांचे ट्वीट

“उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह यांनी नुकताच पुणे दौरा केला. मागे यासंदर्भात आम्हाला विचारण्यात आले होते की त्यांच्या दौऱ्याला मनसे विरोध करणार का? त्यावेळी आम्ही “अतिथी देवो भव”ची भूमिका मांडली. आज त्यांनी सुद्धा अयोध्येत राज साहेबांचे स्वागत केले जाईल अशीच भूमिका मांडली. अनेकदा राजकीय भूमिका या गैरसमजुतीतून घेतल्या जातात. राज साहेब हे कधीच कोणाचाही द्वेष करत नाहीत तर प्रत्येक राज्यातील तरुणांना प्रथम प्राधान्य मिळावे केवळ एवढीच त्यांची भूमिका असते हे बृजभूषण सिंह सिंह यांना देखील लक्षात आलेच असेल व त्यामुळे त्यांचा देखील गैरसमज दूर झाला असेल हे त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते”, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले.

- Advertisement -

काय म्हणाले होते बृजभूषण सिंह?

“राज ठाकरे यांचा मी सैद्धांतिक मुद्यावर विरोध केला होता. त्यांच्याशी माझे वैयक्तिक वाद नाहीत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये कधीच दुरावा नव्हता. दोन्ही राज्यांचे आपसात प्रेम आहे. उत्तर प्रदेशमधील असंख्य लोक महाराष्ट्रात येऊन आपली उपजीविका भागवतात. माझाही कधी महाराष्ट्राला विरोध नव्हता”, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी मांडली होती.


हेही वाचा – नागपूरची जागा काँग्रेसकडेच आणि नाशिकमध्ये शुभांगी पाटील आमच्या उमेदवार; पटोलेंनी केले स्पष्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -