घरमहाराष्ट्रपुणेराज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; उष्म्यात पडणार तीन अंश सेल्सिअसची भर

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; उष्म्यात पडणार तीन अंश सेल्सिअसची भर

Subscribe

पुणे : अवकाळी पावसामुळे राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा फटका शेती पिकांना मोठा प्रमाणावर बसत आहे. पुढील काही दिवसात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. (There is a possibility of rain in some districts of Marathwada along with western Maharashtra)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील 4 आणि विदर्भातील 11 अश्या एकूण 15 जिल्ह्यात आज आणि उद्या वातावरण पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील 10, आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात येत्या रविवारपर्यंत (23 एप्रिल) अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याशिवाय उष्णतेतही वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात कडक उन्हाचे चटके जाणवत असले तरी सदर तापमान सरासरीइतकेच आहे. पण येत्या एक-दोन दिवसात या उष्णतेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, अवकाळी पाऊस, गारपिटीदरम्यान अनेक भागांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनाही घडत आहे. त्यामुळे या वातावरणात घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त असून गारपिट होण्याची शक्यता  आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

- Advertisement -

शेती पिकांना फटका
अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळे जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -