घरमहाराष्ट्रकाँग्रेसशिवाय आघाडी होऊ शकत नाही अन् झाल्यास तिला यश मिळणार नाही; पृथ्वीबाबांचं...

काँग्रेसशिवाय आघाडी होऊ शकत नाही अन् झाल्यास तिला यश मिळणार नाही; पृथ्वीबाबांचं रोखठोक मत

Subscribe

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसविना तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले. यावरुन काँग्रेस नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. राजकारणात राजकीय महत्त्वकांक्षा ठेवणं गैर नाही. पण बेकीचं वातावरण करुन विरोधकांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करू नये, असं सांगतानाच काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही. अशी आघाडी झाल्यास तिला यश मिळणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सुवर्ण विजय द्विसप्ताह निमित्त पुण्यात शहर काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी तिसऱ्या आघाडीवर रोखठोक मत व्यक्त केलं. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आम्ही काम केलं आहे. त्यांना त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना काही राजकीय महत्त्वकांक्षा असतील तर त्यातही काही गैर नाही. परंतु मोदींनी पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे. त्या एकजुटीत त्यांनी कुठेतरी बेकीचं वातावरण निर्माण करु नये. ती एकजूट तोडण्याचा प्रयत्न करु नये, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी निवडणुका जिंकाव्या

पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा निवडणुका जिंकल्या पाहिजेत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. निवडणुका जिंकल्यानंतर जे चित्र निर्माण होईल, त्यानंतर नेते पुढचा निर्णय घेतील. तसंच, सर्व विरोधी पक्षांची एकजूट होईल अशी आशा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. तसंच, कदिलाने मोदींच्या कारभारावर टीका केली पाहिजे. त्यांचा कारभार उघड केला पाहिजे, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.


हेही वाचा – काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी…’; अशोक चव्हाणांनी शेअर केला विलासराव देशमुखांचा तो व्हिडिओ

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -