घरताज्या घडामोडीKylie Jenner billionaire Story: एक किस आणि महिला झाली अब्जाधीश

Kylie Jenner billionaire Story: एक किस आणि महिला झाली अब्जाधीश

Subscribe

जेव्हा आपण एखाद्याला आपलं मानतो आणि तो तुमच्या एका कमीची चेष्टा करतो, तेव्हा त्या व्यक्तीला चुकीचं सिद्ध करणं हे काही वेळेला त्या व्यक्तीच्या आयुष्यातील ध्येय बनते. अशीच काहीशी गोष्ट अमेरिकन मॉडेल आणि बिझनेसवुमन कायली जेनरसोबत घडली. बॉयफ्रेंडच्या एका कमेंटनंतर कदार्शियन बहिणीने स्वतःच्या लिप किट नावाने कॉस्मेटिक लाईन सुरू केली. त्याच्या आधावर कायली जेनर कमी वयात अज्बाधीश झाली. (Kylie Jenner billionaire Story)

एका किसने केले सेल्फमेड अज्बाधीश

हॉलिवूडच्या कदार्शियन बहिणी जगभरात खूप लोकप्रिय आहेत. सर्वात जास्त चर्चा मॉडेल आणि बिझनेसवुमन कायली जेनरची होत असते. कायली आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जगभरात तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. एकेकाळी कायलीच्या छोट्या ओठांमुळे तिच्या बॉयफ्रेंडने चेष्टा केली होती. फक्त २४ वर्षांची असलेली कायली जेनरने या किस्साबाबत टीव्ही शो ‘कीपिंग अप विद द कार्दशियंस’मध्ये सांगितले होते की, तिने मेकअप करण्यास तेव्हापासून सुरुवात केली जेव्हा तिला आपल्या ओठ्यांबाबत इंसिक्योरिटी फील होण्यास सुरुवात झाली. तिच्या बॉयफ्रेंडने किस केल्यानंतर तिला कमेंट केली होती, ती एक चांगली किसर आहे, परंतु तिचे ओठ खूप छोटे आहेत. त्यानंतर कायलीला ती किस करण्याच्या लायकीची नसल्याचे वाटू लागले. त्यानंतर कायलीने तेव्हापासून लिप फिलर्सचे एक्सपेरिमेंट करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

वयाच्या १९वर्षी सुरू केला लिप किटच्या बिझनेस

कायलीने वयाच्या १९ वर्षी कायली लिप किट नावाचे कॉस्मेटिक लाईन सुरू केली होती, हे खूप कमी जणांना माहित आहे. पण कायलीचा हा बिझनेस खूप लोकप्रिय झाला. कायलीने याला कायली कॉस्मेटिक्स असे नाव दिले. याच बिझनेसने तिला लहान वयात अब्जाधीश बनवले. तिचा मेकअप ब्रँड संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. सध्या कायली जेनर दुसऱ्यांदा गर्भवती आहे आणि लवकरच तिच्या घरी आणखीन एका पाहुण्याचे आगमन होणार आहे.


हेही वाचा – एअरपोर्टवर ‘गली बॉय’ फेम विजय वर्मा अन् दीपिकाची अचानक भेट, दोघांच्या सेल्फीवर रणवीरची रिअ‍ॅक्शन


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -