घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहाशिवरात्रीनिमित्त होणार्‍या अखंड हरिनाम सप्ताहाचे 'हे' यजमानपद मुस्लिम बांधवांकडे

महाशिवरात्रीनिमित्त होणार्‍या अखंड हरिनाम सप्ताहाचे ‘हे’ यजमानपद मुस्लिम बांधवांकडे

Subscribe

संगमनेर : तालुक्यातील बोटा येथे दोन समाजातील एकोप्याचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. गावकर्‍यांनरी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी गावातील मुस्लीम बांधवांनी मंडपासाठी योगदान देत यामध्ये आपलाही सहभाग नोंदवला आहे. बोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्या काठी श्री कचेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कच नदीच्या काठी श्री कचेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात झाली असून रविवार दि.१९ फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताह काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच रोज सायंकाळी बोटा, केळेवाडी, कुरकुटवाडी, तळपेवाडी, माळवाडी, हनुमाननगर ग्रामस्थांच्या पुढाकाराने कीर्तनानंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आहे.

- Advertisement -

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. बोटा गाव विधायक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. गेल्या अनेक वर्षांपासून गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम आहे. या सप्ताहात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. मुस्लीम बांधवांनी मंडप खर्चाची जबाबदारी घेत धार्मिक विद्वेषाला गावकरी कधीच बळी पडणार नाही, असा संदेशच देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी हिंदूंनी जागा आणि इतर योगदान दिल्याची उदाहरणेही आहेत. तर मुस्लिमांनीही हिंदूंना धार्मिक कार्यक्रमांसाठी मदत केल्याचे उदाहरणेही पुढे येत आहेत.

मंडप खर्चाचे यजमानपद मुस्लीम बांधवांना द्या, अशी विनंती आम्ही सप्ताह कमिटीला केली होती. कमिटीने सामाजिक एकोपा आणि सलोख्यासाठी दोन पावले पुढे येऊन आम्हाला मंडप खर्चाची जबाबदारी दिली आहे. : शौकत शेख, नुरानी मस्जिद व कब्रस्तान ट्रस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -