घरअर्थजगतमहागाईच्या दराने गाठला उच्चांक; तेल, दूध, खाद्यपदार्थांमुळे नोकरदारांच्या खिशाला कात्री

महागाईच्या दराने गाठला उच्चांक; तेल, दूध, खाद्यपदार्थांमुळे नोकरदारांच्या खिशाला कात्री

Subscribe

Consumer Price Index in India | विविध वस्तूंच्या, मुलभूत गरजांच्या किमती वाढत गेल्याने किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. परिणामी एकूण महागाई दर उंचावला आहे.

Consumer Price Index in India | नवी दिल्ली – देशात महागाईने (Inflation Rate) उच्चांक गाठला असून दर महिन्याला महागाई दराचा (Inflation Rate) आलेख उंचावताना दिसत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी महागाई धीम्या पावलाने वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. विविध वस्तूंच्या, मुलभूत गरजांच्या किमती वाढत गेल्याने किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. परिणामी एकूण महागाई दर उंचावला आहे.

हेही वाचा – माफी मागा अन्यथा..; राहुल गांधींना मिळाली विशेषाधिकार भंगाची नोटीस

- Advertisement -

डिसेंबर २०२२ मध्ये महागाई दर ५.७२ टक्के होता. तो वाढून आता ६.५२ टक्के झाला आहे. तृणधान्ये ९.६७ टक्के, दूध आणि उत्पादने ६.६१ टक्के, भाज्या ६.०४ टक्के, तयार जेवण, स्नॅक्स, मिठाई इत्यादी ५.५५ टक्के, मांस आणि मासे ३.६१ टक्के, तेल आणि चरबी ३.५६ टक्के, विविध खाते २३.३२ टक्के, परिवहन आणि दळवण ८.५९ टक्के, आरोग्य ५.८९ टक्के, शिक्षण ४.४६ टक्के, गृहनिर्माण १०.०७ टक्के, इंधन आणि ऊर्जा ६.६४ टक्के, कपडे आणि पादत्राणे ६.५३, पान, तंबाखू आणि मादक पदार्थ २.३८ टक्के महागाईचा दर नोंदवण्यात आला आहे. पालेभाज्या आणि इतर भाज्यांचा महागाईचा दर घटून वजा ११.७० टक्के झाला आहे.

हेही वाचा – आता ‘गोकुळ’चं दूध महागलं! 1 लिटरसाठी मोजावे लागणार इतके पैसे

- Advertisement -

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत जात असल्याने इतर वस्तुंच्या किमतीही गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. बेरोजगारी आणि पगार कपात अशा विविध कारणांनी नोकरदारवर्गाने पिचलेला असताना महागाई मात्र रॉकेट वेगाने उंचावते आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हेही वाचा – साहेबांच्या व्हिस्कीचे चाहते वाढले; करून दिली रग्गड कमाई

 

Related Last Previous Unit Reference
Inflation Rate 6.52 5.72 percent Jan 2023
Consumer Price Index CPI 176.50 175.70 points Jan 2023
GDP Deflator 173.30 160.10 points Dec 2023
Food Inflation 5.94 4.19 percent Jan 2023
Inflation Rate MoM 0.46 -0.45 percent Jan 2023
CPI Transportation 163.60 163.40 points Jan 2023
CPI Housing Utilities 172.10 170.70 points Jan 2023
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -