घरठाणेमाघ पौर्णिमेला श्रीमलंग गडावर बाळासाहेबांची शिवसेनाच्या माध्यमातून जाणार हजारो हिंदु

माघ पौर्णिमेला श्रीमलंग गडावर बाळासाहेबांची शिवसेनाच्या माध्यमातून जाणार हजारो हिंदु

Subscribe

“हर हर महादेव” अशा गगन भेदी गर्जना करीत खांद्यावर भगवे ध्वज घेऊन हजारो हिंदू बांधव आणि शिवसैनिक रविवारी ५ फेब्रुवारीला माघी पौर्णिमा निमित्ताने “श्रीमलंग गडावर” जाऊन पुजा करणार आहेत. तसेच बाळासाहेबांची शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडावर जाऊन आरती करून दर्शन घेणार आहेत.या आंदोलनामागे अन्य धर्मियांचा द्वेष करणे व त्यांच्या धार्मिक भावना दुखावणे हा हेतू नसून श्री मलंगगडावर हिंदूंचे वाहिवाट चालू ठवणे हा आहे. हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट ठरणार आहे असे प्रतिपादन गुरूवारी चलो मलंगड पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी केले.

या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यात युतीचे शासन असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. असंख्य हिंदूनिष्ठ संघटना या धार्मिक कार्यात हिरीरिने भाग घेणार आहेत. यावेळी पत्रकार परिषदेस आमदार विश्वनाथ भोईर, शहर प्रमुख रवी पाटील, राजेश मोरे, मलंग मुक्तीचे अभ्यासक दिनेश देशमुख, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

श्री मलंग गडावरील मच्छींद्रनाथांचे मंदिराबाबत श्रीमलंगडाची माहिती देताना दिनेश देशमुख म्हणाले, श्रीमलंग मच्छिद्रनाथ मंदिर हे मुळ हिंदूंचे देवस्थान आहे, हिंदूचे पुजास्थान आहे. पवित्र क्षेत्र म्हणून या देवस्थानाला फार मोठा इतिहास आहे. परंतु दुर्दैवाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुर्लक्षपणामुळे मुसलमानांची वस्ती वाढत चालली आहे. मुसलमानांनी कोर्टात धाव घेतल्यामुळे कोर्टाने हे मंदिर सर्व धर्मियांचे स्थान आहे असे जाहिर करुन विश्वस्त नेमले. हिंदू पध्दतीने होणारी पूजा अर्चा नष्ट करु पाहत आहेत. हिंदूंना पुजा धार्मिक विधी करण्यासाठी अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे हिंदू मंचाची स्थापना करुन श्रीमलंग जागरणाचे नेतृत्व केले. गडावर हिंदूंची वहिवाट वाढावी म्हणून पूर्वापार चालणारे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू महासभा आदी १६ हिंदूत्ववादी संघटना सहभाग घेत आहेत.

- Advertisement -

हिंदूच्या धर्मस्थळावर अतिक्रमण करुन नंतर त्यांच्यावर आपला हक्क सांगण्याची अन्य धर्मियांची वुत्ती संतापजनक आहे. शासन व पोलीस यंत्रणेमार्फत हिंदू धर्मियांवर दडपण श्रीमलंग हे हिंदूंचे देवस्थान म्हणून श्रीमलंगडावर हिंदूंची वहिवाट निर्माण करणे हा आमचा हक्क आहे. कारण हिंदूची वहिवाट ही मलंगमुक्तीची पहाट ठरणार आहे. तरी सर्व हिंदू बांधवांनी श्रीमलंग नाथाच्या माघी पौर्णिमच्या उत्सवास रविवारी सामिल व्हावे व धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेला “जय मलंग श्रीमंगल” हा मंगलनाथांचा उत्सव प्रचंड उत्साहात व जल्लोषात साजरा करावा असे आवाहन बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -