घरमहाराष्ट्रकुटुंबीयाच्या त्रासाला कंटाळून मुलीने घर सोडले, नवनीत राणांनी केलेला लव्ह जिहादचा दावा...

कुटुंबीयाच्या त्रासाला कंटाळून मुलीने घर सोडले, नवनीत राणांनी केलेला लव्ह जिहादचा दावा खोटा?

Subscribe

अमरावती – खासदार नवनीत राणा यांनी एका मुलीसंदर्भात केलेला लव्ह जिहादचा दावा खोटा ठरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली मुलगी पोलिसांना आज सापडली, मात्र तिने दिलेला जबाब हा नवनीत राणांना तोडांवर पाडणारा आहे. कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून तिने घर सोडल्याचा जबाब पोलिसांना दिला. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.

हेही वाचा – अखेर अमरावतीच्या लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी पोलिसांच्या ताब्यात; गुढ कायम

- Advertisement -

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९ वर्षीय तरुणी बँकेत जाते असं सांगून बाहेर पडली ती घरी आलीच नाही. मंगळवारपासून ती बेपत्ता होती. तिच्या वडिलांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रारही दाखल केली. मात्र, याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. लव्ह जिहादचा हा प्रकार असून लवकरात लवकर कारवाईच्या सूचना केल्या. तसंच, शहरातील आंतरधर्मीय विवाह आणि लव्ह जिहाद प्रकरणातील मुलाशी थोडा कठोर व्यवहार करा, असे सांगण्यासाठी फोन केल्यानंतर मनीष ठाकरे यांनी आपला कॉल रेकॉर्ड केला. यावरूनही नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. यावेळी पोलीस अधिकारी आणि खासदार राणा यांच्यात मोठा वाद झाला. तब्बल वीस मिनिटे नवनीत राणा यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

दरम्यान, संबंधीत तरुणी ही निजामुद्दीन ते वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यावेळी ही ट्रेन सातारा स्थानकावर येताच पोलिसांनी स्टेशन मास्तरांना फोन करून गाडी स्टेशनवरच थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास या मुलीला ताब्यात घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – फाशीनंतर याकूबचं प्रेत कुटुंबीयांना का दिलं? अरविंद सावंतांचा केंद्राला सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलिसांनी या रेल्वेच्या 22 डब्यांची तपासणी केली. त्यातील एस 6 एस 7 या डब्यामध्ये ही मुलगी एकटी प्रवास करताना आढळून आली. दरम्यान, अमरावती पोलीस ठाण्यात ही तरुणी मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या मुलीचे लोकेशन पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत असल्याने तिचा शोध व्हावा, अशी विनंती लोहमार्ग पोलिसांना करण्यात आली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या मुलीचा फोटो पाठवून शोध सुरू केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -